भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी
ठाणे (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी जय शिवराय...अशा घोषणा देत आज भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.ठाण्यातील शासकीय विश्रामगृह ते मासुंदा तलावपर्यंत रॅलीचे आयोजन करीत शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या रॅलीत शाळेतील विद्यार्थी,महिलावर्गाने उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे संपुर्ण वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाँ.आप्पासाहेब आहे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री बन्सीदादा डोके, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री पी.जी.पवार,राष्ट्रीय सरचिटणीस श्री राम शिंदे,राष्ट्रीय सचिव श्री राजेंद्र जगदाळे,जिल्हाप्रमुख श्री किशोर पवार,श्री दिलीप चव्हाण,श्री अशोक साळवी,श्री अविनाश साळवी,श्री प्रदिप मोरे,श्री सुरेश कदम,श्री रविंद्र चव्हाण,श्री अमित कदम,श्री अमित नाईक,विपूल माने आदींसह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा