भाजपा ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्षपदी अशोक राय यांची निवड
मुंबई(शांताराम गुडेकर )
भाजपच्या ईशान्य मुंबई जिल्हातर्फे घाटकोपर पश्चिम येथील हिंदी हायस्कुल येथे कार्यकर्ता संमेलन पार पडले.या संमेलनात भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्ष पदी अशोक राय(बाबूजी)यांची निवड केली.या संमेलनाला खासदार मनोज कोटक,आमदार राम कदम,अमित साटम,पराग शहा,श्रीनिवास त्रिपाठी,विनायक कामत,भालचंद्र शिरसाट,नवल किशोर पुराणिक,चंद्रप्रकाश पाड्ये,विजय पुराणिक,डाँ.हरिचंद्र त्रिपाठी,धर्मवीर सिंह,आयशा शेख,डाँ. विनोद त्रिगुणायक,चंद्रकांत शुक्ला,महेंद्र उपाध्याय,रुपेश सिंह,विजयकांत त्रिपाठी,चंद्रकांत मालकर,अनिल निर्मळे,रितु तावडे,भावेश भानुशाली,विकास कामत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.आशोक राय याःची भाजपा ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री खारका महावीर एज्युकेशनल ट्रस्टचे विश्वस्त व आयआयटी माईडस् चे संचालक घाटकोपर मधील समाजसेवक देवेंद्र शुक्ला व सुरेश मिश्रा यांनी शाल व पुष्पकरंडक देऊन त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या.यावेळी ईशान्य मुंबई भाजपा पदाधिकारी,सदस्य व सभासद कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा