उच्चप्रतीच्या बनावट भारतीय चलनी नोटा बाळगणाऱ्यास मुंबई पोलीसांकडून अटक
मुंबई (सुनिल महाकाळ) दुबईवरून भारतात उच्चप्रतीची बनावट भारतीय चलनी नोटा वितरणासाठी आलेल्या इसमास मुंबई पोलीसांनी जेरबंद केले असून त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मीनल-२ येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिकृत सुत्राकडून मिळालेल्या माहीतीनुसार सह पोलीस आयुक्त (गुन्हे), मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस उप आयुक्त (प्र-१) यांचे पर्यवेक्षणाखाली गु. प्र.शा.,गु.अ.वि. कक्ष-८, मुंबई या कक्षातील अधिकारी व अंमलदारांची दोन पथके तयार करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ , टर्मीनल-२ येथील आगमन कक्षाच्या परिसरामध्ये पंचासह सापळा रचण्यात आला. सकाळी ०९:३० वा. चे दरम्यान मिळालेल्या खबरीतील वर्णनाशी साधर्म्य असलेला एक सडपातळ बांध्याचा , ऑरेंज कॅप ,काळया रंगाचा फुल बाहयाचा टी शर्ट व सफेद रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला इसम बसस्टॉप वर आला. सदर इसमाचे वर्णन हे मिळालेल्या गोपनीय माहितीमध्ये नमुद इसमाच्या वर्णनाशी तंतोतंत मिळते जुळते आढळुन आल्याने त्यास गु.प्र.शा.,गु.अ.वि.कक्ष-८ चे प्रपोनि अजय जोशी व पथकाने घेराव घालुन ताब्यात घेतले. सदरवेळी त्याच्याकडे एक चॉकलेटी रंगाची ट्रॅहॅल्स बॅग, एक सफेद-ऑरेज रंगाची ट्रॉली बॅग, एक खाकी बॉक्स व एक काळया रंगाचा हॅण्डबॅग सोबत असल्याचे दिसुन आले. त्याची रितसर अंगझडती घेतली असता, त्याने सोबत आणलेल्या चॉकलेटी रंगाच्या ट्रर्व्हल्स बॅगेमध्ये रू. २०००/- इतक्या दर्शनी किंमतीच्या एकुण ११९३ नोटा (एकुण किं.रू. २३,८६,०००/- ), सदर इसमाचा भारतीय पारपत्र व इतर साहित्य मिळुन आले. नमुद इसमाकडे मिळालेल्या भारतीय चलनी नोटांबाबत सखोल विचारपुस केली असता, त्याने सदर नोटा हया बनावट असुन ते मुंबईसह उर्वरीत ठिकाणी वितरीत करण्यासाठी आणल्याचे सांगीतले. याबाबत आरोपीकडे मिळुन आलेल्या रू. २०००/- दर्शनी किंमतीच्या बनावट नोटा हया खऱ्या भारतीय चलनातील वैशिष्ठयांशी (Standard Features ) बारकाईने ताडुन पाहिले असता त्यामध्ये तफावत आढळुन आली (उदा.खऱ्या नोटातील Security Thread व रू. २००० या अंकामध्ये समोरून व संमातर पाहताना होणाऱ्या रंगातील बदल आरोपीकडे मिळुन आलेल्या नोटामध्ये आढळुन आले नाही. ). एकंदरीत आरोपीकडे मिळुन आलेल्या नोटा हया उच्चप्रतीच्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरूध्द सरकारतर्फे फिर्याद नोंद करून सहार पो.ठाणे येथे गु.र.क्र. ४३/२०२० कलम ४८९ (ब),४८९(क),१२०(ब),३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास गु.प्र.शा.,गु. अ.वि. कक्ष-८, मुंबई येथे वर्ग झाल्याने गु.र.क.३७/२०२० अन्वये नोंद घेवुन तपास चालु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा