विशेष लेख : शेकडो रसिकांचे व कलाकारांचे नटसम्राट, साई श्रद्धा कलापथकचे प्रेरणास्थान कै. धोंडू गोपाळ कानसे


महाराष्ट्राचा शिरपेच सोनेरी मुकुट म्हणजे आपलं कोकण जिथे प्रथम संस्कृती जपली जाते. आणि अश्याच संस्कृतीचे जतन करणारे कोकणातील मायानगरीत गुहागर तालुक्यातील चिखली गावचे सुपुत्र नटसम्राट, उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक,अभिनेते कलावंत म्हणजे साई श्रद्धा कलापथकचे तथा कानसे  समूहाचे आणि शेकडो निस्वार्थी कलाकार घडवून त्यांच्या उज्वल भविष्याचे शिल्पकार, गुरुवर्य, प्रेरणाथान म्हणजे कै. धोंडू गोपाळ कानसे. 


चिखली येथे १ जून १९५७ साली गरीब कुटुंबात जन्माला आलेला दिवा जणू शालेय जीवनापासूनच अभिनयाची वाटचाल करू लागले. वयाच्या १२ व्या वर्षा पासून अभिनय आणि लेखनाची सुरवात केली ती म्हणजे कोकणातील संस्कृती जपणाऱ्या बहुरंगी नमनातून  कोकणारतील लोककला अबाधीत ठेवण्याच्या उद्धेशाने स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले. त्या दरम्यान रोजी रोटी चालावी म्हणून उदर निर्वाह करिता रेशन दुकानावर शासकीय कर्मचारी म्हणून काम करत होते, पण उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यास हे काम देखील आडवे येत होते. शेवटी त्या सम्राटाने ते काम देखील सोडण्याचा निर्णय घेतला आणि साधे पेंटरेचे काम करता करता स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम झाले. रसिक प्रेक्षकांसाठी पूर्णतः या कलेला जोपासण्यास उतरले ते शेवटच्या क्षणा पर्यंत माघे वळून पहिलेच नाही. म्हणूनच आजही ते रसीकांच्या मनात ते विविध रुपात पाहायला मिळाले  ते म्हणजे कधी श्रीकृष्ण, कंसराजा तर अगदी उत्कृष्ट खलनायक म्हणून देखील रसीकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलावंत लेखक, दिग्दर्शक निर्माते म्हणून मुख्य भूमिका पार पाडू लागले. त्यांच्या धार धार  लेखणीतुन खास लिखित वगनाट्य म्हणजे, मोहिनी रूप, खुनाचा बदला खून, ब्राम्हतत्तेचे  पातक, हिऱ्याचा शोध, चंडीकेच्या देवळात तीन बळी, मेवडचा सैतान, भाऊच भावाचा वैरी, चंद्र मोहन, सातवी खोली, बहीण भावाचा छळ, गरिबांचा वाली, मर्द मराठ्यांच्या झोपडीवर हल्ला,  गरिबांच्या झोपडीला न्याय नाही, पापाचे प्रायश्चित्त, आणि शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी, महाराज शिवाजी मंदिर दादर या मंचावर सादर होणारे त्यांच्या लेखणीतून लिहिले गेलेले, काल्पनिक वागनाट्य *" अग्नी आहे साक्षीला"* अशा विविध बोधदाई  विचारानी नटलेले हे थोर कलावंत अखेर १० ऑगस्ट २०१२ साली रसिकाना सोडून बहुरंगी नमनातील उत्कृष्ट नटसम्राट म्हणून आज ही अजरामर आहेत.


परंतु.....
पित्याला गुरुस्थानी मानून पित्याचे स्वप्न व विचार चंद्र- सुर्या प्रमाणे अबाधित ठेवण्याचे कर्तृत्व रक्तातच असत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे चिरंजीव तथा साई श्रद्धा कलापथकचे सर्वे सर्वां, पित्याच्या नावा प्रमाणे नावलौकिक झालेले प्रख्यात कलावंत दिग्दर्शक निर्माते श्री. संदीप धोंडू कानसे. अगदी वडिलांन प्रमाणे त्याच ध्येयाचे त्याच शिखरांची वाटचाल करणारे नमन कलामांच्यात वडिलांचं स्वप्न साकार करून नुसते शकत नव्हे तर तब्बल १५३ प्रयोग सादर करण्याचा पराक्रम व कोकणातील संस्कृती जपण्याचा पराक्रम व विविध मंचावर बोध देणारे वगनाट्य सादर करणारा मंच असे आजवर यांच्या मंचाकडे पहिले जात आहे.
पण कै. धोंडू गोपाळ कानसे यांच्या निस्वार्थी कलाकार घडवण्याच्या तालमीत तरबेज झालेला कलाकार मात्र आज ही रसिकांची नमभरून मनोरंजन करून मने जिंकताना पाहायला मिळत आहे. 


परंतु यांच्यातील विषेश गुण असा कि, रसिकांनसाठी दर वेळी काहीतरी वेगळे सादर करणे आणि या साठी लागणारी स्वताची साधन सामुग्रीचाच वापर करणे. स्वतः मंच उभारण्यासाठी भाड्याच्या वस्तूला त्यांचा नेहमी विरोध असायचा. कारण लोककेले साठी स्वतःचे भांडवल असणे काळाची गरच असे त्यांना नेहमी वाटायचे. आणि जास्तीत जास्त कला कसी सादर करता येईल यावर त्यांनी नेहमी विशेष भर दिला.
आणि त्यांच्या पश्चात देखील साई श्रद्धा कलापथक  या मंचाने कलावंत धोंडू गोपाळ कानसे यांचे नाव आज ही रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक थोर नटसम्राट म्हणून अजरामार आहेत. अशा कलावंताला कोटी कोटी मानवंदना.


शब्दांकन 
श्री. दीपक तुकाराम मांडवकर


टिप्पण्या