भारतीय मराठा महासंघातर्फे १९ फेब्रुवारी रोजी ठाण्यात शिवजयंती उत्सवाचे आयोजन


ठाणे (प्रतिनिधी) भारतीय मराठा महासंघाच्यावतीने बुधवारी दि. १९ फेब्रुवारी 2020 रोजी ठाण्यातील खोपट येथे स.११ वा. शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या उत्सवांतर्गत महाशिववंदना आणि स्वच्छता अभियान,तसेच रुग्णालयांत गरजूंना फळांचे वाटप करणे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात येणारे आहेत.


   तरी सर्व शिवप्रेमींनी वेळेत हजर रहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष श्री आप्पासाहेब आहेर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री बन्सीदादा डोके,राष्ट्रीय सरचिटणीस श्री राम शिंदे,राष्ट्रीय सचिव श्री राजेंद्र जगदाळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री डां.पी.जी.पवार यांनी केले आहे.


टिप्पण्या