मुंब्रा रेतीबंदर येथे सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला करुन पलायन केलेला चोरटा अटकेत

गुन्हे शाखा युनिट -१,ठाणे ची कामगिरी "



ठाणे (प्रतिनिधी) " प्रसिध्द् अभिनेत्री नूतन (मालक- मोहनीश बहल) हिचे बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणुन काम करीत असलेले भानुदास शरणप्पा यांच्यावर प्राणघातक हल्ला करन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीसांना यश आले आहे.


   प्रसिध्द् अभिनेत्री नूतन (मालक- मोहनीश बहल) यांचे रेतीबंदर जवळील टेकडीवर मुंब्रा येथील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून रात्रीपाळी डयुटीस असलेले श्री भानुदास शरणप्पा दुधभाते, वय-७० वर्षे, राहणार-मुंब्रा, ठाणे व त्यांचा सहकारी श्री रुपसिंग विश्वकर्मा यांना रात्री ०१:०० वा.चे सुमारास बंगल्याचे मागून कुत्रे भुकंण्याचा आवाज आला म्हणून ते बंगल्याच्या मागे गेले असता, तीन अनोळखी चोरटयांनी त्यांचेवर हल्ला करुन दोन्ही सुरक्षा रक्षकांना लाकडी दांडक्याने जबरी मारहाण करुन गंभीर जखमी केले होते, त्यांना इंद्रावती हॉस्पिटल, नवी मुबंई येथे दवाउपचार करीता दाखल केले असताना, श्री भानुदास शरणप्पा दुधभाते यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. १४४/ २०२०, भादंवि कलम ३९७,३४ प्रमाणे दि. ०३/०२/२०२० रोजी तीन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.


   गुन्हे शाखा,घटक-१,ठाणे कडून सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना सदर तपासामध्ये घटनास्थळी व आजूबाजूस गुन्हेगारांबाबत कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध झालेला नव्हता. सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू असताना इकडील घटकाचे सपोनिरी संदीप बागूल यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा संजय सुभाष भडारी, राह. भास्करनगर, कळवा, ठाणे व त्याचे इतर साथीदार यांनी केला असुन तो भास्करनगर कळवा पूर्व ठाणे येथे आला आहे. मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे शाखा घटक १ चे अधिकारी सपोनिरी संदीप बागुल,पोउपनिरी कैलास सोनावणे व अमंलदार यांनी सापळा लावून त्यांस कळवा, ठाणे येथून दि.०८/०२/२०२० रोजी १४:३० वाजता ताब्यात घेतले आहे. ' सदर आरोपीत याचेकडे सखोल व कौशल्यपुर्वक विचारपूस करता साथीदार जितू वाघमारे उर्फ कान्या, गणपत स्वामी गुलर (मद्रासी) रा. कळवा यांनी दि. ०३/०२/२०२० रोजी रात्रौ ०१:०० वा.चे सुमारास नूतन बंगला येथे जावून तेथील सुरक्षा रक्षकांना लाकडी दाडक्याने मारहाण करन गंभीर जखमी केले व त्यानंतर सदर बंगल्या वरील छतावर चढून कौले काढून आतील पाईप, नळ इत्यादी वस्तू चोरुन नेल्याचे सांगुन गुन्हा केल्याची कबुल केले. आरोपीस पुढील तपासकामी लेखी रिपोर्टाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन करीत आहेत.


  वरील कामगिरी पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर,पोलीस सह आयुक्त वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त श्री सरेश कमार मेकला, अपर पोलीस आयुक्त श्री.प्रविण पवार, गुन्हे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. दिपक देवराज, गुन्हे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध-१) श्री किसन गवळी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सपोनि / संदीप बागुल, अविराज कुराडे, समीर अहिरराव पोउपनि / दत्तात्रय सरक, कैलास सोनावणे, सहा.पोउपनि उदय देसाई, पोहवा/आनंदा भिलारे, आबतालिब शेख, शिवाजी गायकवाड, सुनिल जाधव, सुभाष मोरे, प्रकाश कदम, पोना/दादा पाटील, किशोर भामरे, अजय साबळे या पथकाने केली आहे.


 


टिप्पण्या