नवी मुंबईत अज्ञात इसमाची फास लावून आत्महत्या
नवी मुंबई (राहूल अहिरे ) नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.सदरचा प्रकार मनपा हास्पीटल,वाशीच्या रुग्णालयात आढळून आला आहे.याबाबत मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरु आहे.
२८ जानेवारी 2020 रोजी एक अनोळखी व्यक्ती ४० ते ४५ वयोगटातील असलेला मनपा हास्पीटल,वाशी येथे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याची खबर सिक्युरिटी आफीसर श्री पाटील यांनी एनआरआय पोलीसांना दिली होती.सदरचा व्यक्तीने दोरखंडाने फास लावून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या व्यक्तीची अजूनही ओळख पटली नाही.पुरुषाची उंची अंदाजे ५ फुट ७ इंच,रंग-सावळा,केस-वाढलेले,कपाळ उंच,उजव्या हातात पिवळ्या रंगाची धातूची अंगठी,निळ्या रंगाचा जिन्स शर्ट असा आहे.वरील नमुद अनोळखी मयत इसमाचा व वारसाचा शोध लागल्यास खालील नमुद पत्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 022-27564404,9987096067.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा