तृप्ती देसाईंनी ह.भ.प इंदुरीकर महाराजांवर टिका करण्यापेक्षा कोपर्डी आणि हिंगणघाट ताईंच्या न्यायासाठी झटावे - डाॅ.आप्पासाहेब आहेर


ठाणे (प्रतिनिधी) तुप्ती देसाई ह्या सदोदित चर्चेत दिसून येत आहेत.त्यांना समाजात खूप प्रसिद्धी वाढावी वा नावलौकीक व्हावा असे वाटत असेल तर समाजात महिलांवर होणार्या अत्याचाराला सामोरे जावे,आंदोलने करावीत,मोर्चे काढावीत,बलात्कारीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी दरबारी टाहो फोडावा पण वारकरी संप्रदायावर व संतांवर टिका करुन शाप घेवू नये असा सल्ला भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर यांनी दिला आहे.

   कोणताही किर्तनकार संतांचा अभंग घेवून त्यावर विश्लेषन करुन किर्तन करतो.किर्तनात समाज प्रबोधन करीत असतात.इंदुरीकर महाराजही तेच करीत आहेत.त्यांनी गुरु चरित्रातील अध्यायाचा संदर्भ देवून समदिनी-पुत्र,व विषमदिनी कन्या असे जे सांगितले ते त्यांच्या तोंडचे नव्हे,नृसिंह सरस्वती अर्थात दत्तात्रयाचा अवतार यांनी गुरुचरित्रात ब्राम्हणांनी कसे वागावे,ब्रम्ह कर्म कसे असावे हे विस्तारपुर्वक सांगितले आहे,तेव्हा हा पुरावा देवून इंदुरीकर महाराज यांच्यावर आक्षेप ठेवणे चुकाचे आहे.संत वाड:मयाचा आसरा घेवून प्रमाण देवून किर्तन केले जाते.ह.भ.प.इंदुरीकर महाराज हे समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत आहेत.समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्याचे किर्तनातून आवाहन करतात.लग्नाच्या वराती बंद करा,दारु पिऊ नका,संसार उद्वस्त करु नका,मुलींची संख्या वाढवा,गर्भपात करु नका असे सांगत असतात.तेव्हा त्यांच्यावर आक्षेप ठेवल्यास व त्यांनी किर्तन करणे सोडून दिल्यास समाजाचे नुकसान होईल.

   तृप्ती देसाईंनी कोपर्डीच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी झटावे.हिंगणघाट येथील जाळलेल्या शिक्षिकेला नाय मिळवून देण्यासाठी झटावे.संतांच्या मागे लागून संतांवर टिका करुन संतांचा,वारकरी संप्रदयाचा,समाजाचा शाप घेवू नये असे भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.आप्पासाहेब आहेर यांनी सल्ला दिला आहे.

टिप्पण्या