कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या.लांजा या पतसंस्थेला " बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन २०१९ " चा पुरस्कार प्रदान
रत्नागिरी (प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपल्या प्रगतीची घौडदौड कायम राखत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या . लांजा या पतसंस्थेला राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये " बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कार 2019 " गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा . श्री .रमाकांत खलप यांचे शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री . चंद्रकांत परवडी व उपाध्यक्ष श्री . विलास दरडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . संदीप डाफळे यांना दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला आहे.यामुळे महाराष्ट्रातुन या पतसंस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात ज्या सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे अशा सहकारी पतसंस्थाना अविज पब्लिकेशन , कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा , पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको पतसंस्था पुरस्काराचे आयोजन केले जाते . सन २०१९ या वर्षासाठी बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी संस्थेची आर्थिक स्थिती ,व्यवस्थापन , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , व्यवसाय वाढीसाठी केलेल्या नविन योजना इ. बाबत संपूर्ण माहितीच्या आधारे ,तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार नागरी पतसंस्था ठेवी रु. १५ ते २० कोटीपर्यंत या विभागामध्ये राज्यस्तरीय " बँको पतसंस्था ब्ल्यु रिबन - २०१९ " या पुरस्कारासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या लांजा या पतसंस्थेची निवड करणेत आली .
दि . ६ फेब्रुवारी २०२० रोजी गोवा येथे अॅडव्हान्टेज २०२० या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये " बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कार " कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या . लांजा या पतसंस्थेला गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री . रमाकांत खलप यांचे शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री . चंद्रकांत परवडी व उपाध्यक्ष श्री . विलास दरडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . संदीप डाफळे यांना दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला .
कुणबी विकास सहकारी पतसंस्थेवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणारे संस्थेचे ठेवीदार , संस्थेकडून कर्ज घेऊन नियमित परतफेड करणारे कर्जदार संस्थेचे सर्व सभासद तसेच संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान मोठे असून त्यांचा विश्वास व पाठींबा या जोरावर संस्थेला हा पुरस्कार मिळाला असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्री .चंद्रकांत परवडी यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा