चेंबुर येथे महिला सक्षमिकरण व ग्राहक शिक्षण विषयक मार्गदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
पंचरत्न मित्र मंडळ स्वामिनी,भवानी,शिवानी महिला बचत गटाचे स्तुत्य उपक्रम
मुंबई(शांत्ताराम गुडेकर) सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक ,वैद्यकीय ,पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर ,सचिव प्रदिप गावंड,खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम,वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातीलशाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे.नुकतेच जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळ व स्वामिनी,भवानी,शिवानी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मंदिर सभागृह,वाशीगांव,चेंबुर येथे आर.सी.एफ वित्त संचालक उमेश डोंगरे,महाव्यवस्थापक सुहास शेलार,गजानन पाटील, डाँ.विनित गायकवाड,मा.नगरसेवक माणिक पाटील, धनंजय ठाकूर, रमेश पाटील,सतिश कुंभार,अभिनेत्री सोनल पवार,डाँ,जुईली ठाकुर ,मंडळ अध्यक्ष अशोक भोईर,सचिव प्रदिप गावंड,सहसचिव स्नेहा नानिवडेकर,खजिनदार सचिन साळुंखे सदस्या निलम गावंड व वैभव घरत,एम.जी.डिसोजा,डि.एम.मिश्रा,पिंकू चव्हाण यांच्यासह मंडळ अन्य पदाधिकारी,सदस्य यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण व ग्राहक संरक्षण विषयक मार्गदर्शन तसेच विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमासह उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा गौरव सोहळा पार पडला.यानिमिताने डाँ.जुईली ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तर अभिनेत्री सोनल पवार यांना भारताच्या स्री शिक्षणाची गंगोत्री,समाजसुधारक "सावित्रीबाई फुले पुरस्कार-२०२०"मान्यवरांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर यांनी तर शेवटी उपस्थित मान्यवर व महिलावर्ग यांचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी आभार व्यक्त करत या कार्यक्रमाची सांगता केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा