दीड लाख सुरक्षा आवरणे देवून डॉक्टरांविषयी राष्ट्रवादी व्यक्त करतेय कृतज्ञता
आज ठाणे येथे सुरक्षा आवरणे वाटप
मुंबई दि.२५ एप्रिल - कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी दीड लाख सुरक्षा आवरणे तयार करून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या समन्वयातून वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले असून आज ठाणे आणि परिसरात ही सुरक्षा आवरणे वाटप करण्यात आली.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या समन्वयातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सुरक्षा आवरणांचे वितरण होत आहे.
आज ठाण्यातील सर्व डॉक्टर व परिचारिका, सर्व स्टाफ यांना
ही सुरक्षा आवरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, नगरसेविका अनिता
शिंदे, नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाचे समन्वयक तेज टकले, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, मार्डचे अध्यक्ष दिपक मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संजय बोरगे, नीरज महांकाळ आदीजण ही सुरक्षा आवरणे वाटप करण्याचे काम करत आहेत.
संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना डॉक्टर व त्यांचे सहकारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने संपूर्ण चेहरा झाकणारी सुरक्षा आवरणे तयार करण्यात आली आहेत. राज्यभरातील दीड लाख डॉक्टरांना ही सुरक्षा आवरणे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा