वरिष्ठ पोलीस निरिक्षक कन्हैया थोरात यांच्या आश्वासनानंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांचे उपोषण स्थगित


ठाणे (प्रतिनिधी) एखाद्याचे भांडण सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असताना दिव्यातील समाजसेवक अमोल अमोल केंद्रे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केली होती.या घटनेनंतर केंद्रे यांनी घरातच उपोषणाला सुरुवात केली.आजच्या तिसऱ्या दिवसानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री कन्हैया थोरात यांनी भेट घेवून मारहाण करणाऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.या आश्वासनानंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी पुकारलेले उपोषण तुर्तास स्थगित केले आहे.


तीन दिवसांपुर्वी सोसायटीतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी श्री अमोल केंद्रे यांनी सामाजिक भान म्हणुन दिवा येथील (बीट) पोलीस चौकीला सहकाऱ्यासमवेत भेट दिली होती.भेटीदरम्यान कोणतेही कारण न ऐकता  PSI तागड,शिपाई रवी जाधव,आप्पा घोडके यांनी बेदम मारहान केली असल्याचा आरोप केला होता.याबाबत सोशल मिडीयावर मारहाणीचे व्हिडीओ आणि छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते.या मारहाणीत मोठी दुखापत झाल्याचे दिसून येत होते.या प्रकारानंतर केंद्रे यांनी मारहाणीबाबत न्याय मिळावा म्हणुन सबंधित सर्व ठिकाणी आॅनलाईन तक्रार दाखल केली होती.


मारहाणीनंतर अमोल केेंद्रे यांनी गेले तीन दिवस घरातच उपोषण करीत होते.दोन दिवस वरिष्ठ पोलीसांनी कोणतीही दखल न घेतल्याने आज दोन महिलांनी निषेध म्हणून मुंडनही केले.या परिस्थितीची दखल घेत आज तिसऱ्या दिवशी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री कन्हैया थोरात यांनी लेखी निवेदन स्विकारत  मारहाण करणाऱ्या पोलीसांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यानंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी उपोषणास तुर्तास स्थगिती दिली आहे.


    दरम्यान समाजसेवक अमोल केंद्रे यांनी सरकारला सपोर्ट म्हणुन दिव्यातील भुकेलेल्यांना गेला 28 मार्चपासून 1500 जणांना अन्नदान करण्याची नियमित सेवा केली आहेत. जागोजागी पहारा करणाऱ्या  पोलीस बांधवांना चहा,जेवणाची विशेष काळजी घेतली आहे,तरीही काही पोलीस अचानक येतात,विचापुस न करताच बेदम मारहाण करतात याबद्दल नागरिकांनाही आश्चर्य व्यक्त केलं आहे.लाॅकडाऊनसारख्या काळात सरकारलाच मदत करणाऱ्या समाजसेवकांना अशी मारहाण झाल्यास पुढे मदत कार्य करायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे


टिप्पण्या