रत्नागिरी गोगटे-जोगळेकरच्या माजी विद्यार्थांनी दिला कोरोना मुक्तीचा संदेश
२० पुर्वी होते एकाच वर्गात,आता पार पाडताहेत मोठी सामाजिक जबाबदारी
रत्नागिरी (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून 2000 साली आर्टस विभागातून पदवी प्राप्त केलेल्या काही माजी विद्यार्थांनी एकत्र येवून कोरोना मुक्तीचा संदेश दिला आहे.रत्नागिरी,मुंबई,पुणे अशा विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या या माजी विद्यार्थींनी फोटोद्वारे एकत्र येत कोरोना मुक्त जगण्यासाठी घरात रहा,भविष्याचे प्लनिंग करा आणि पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा असा संदेश दिला आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या या विद्यार्थांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन यावर्षी २० वर्षे पुर्ण होत आहेत.या निमित्ताने या विद्यार्थांना येत्या २४ मे रोजी एका स्नेह संमेलनाचे आयोजन देखील केले होते.मात्र देशावर अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे हे स्नेह संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता यातून बाहेर पडल्यानंतर हे स्नेह संमेलन पार पडणार आहे.
या विद्यार्थांनमध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध होटेल व्यवसायिक गणेश धुरी,पुणे येथील प्रसिद्ध होटेल व्यवसायिक समिर भोसले,न्यु इंग्लिश स्कूल जावडे,लांजा रत्नागिरीचे मुख्याध्यापक संदेश कांबळे,साम टिव्हीचे कार्यकारी निर्माता प्रशांत सागवेकर,रत्नागिरी येथील वकील योगिनि सावंत,राष्ट्रवादी कांग्रेसचे पी.आर.ओ.संदिप कांबळे,रत्नागिरीतील व्यवसायिक वैभव पालकर,ठाणे येथील आश्विनी काजळे पेंडसे,विरार येथील मिनल गोखले-जोशी,अलिबाग येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या संगिता दामले-जोशी,ऐरोली येथील वर्षा संसारे-मिरकर या माजी विद्यार्थांचा समावेश आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा