होम क्वारंटाइन १४ दिवस केल्याने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे मुचकुंदी परिसर विकास संघटनेने मानले आभार


होम क्वारंटाइन १४ दिवस केल्याने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे


मुचकुंदी परिसर विकास संघटनेने मानले आभार,


मुंबई (विनोद चव्हाण) पुण्यातून आलेले एका कुटूंबाला १४ दिवसानंतरही कोरोनाची लक्षणे दिसली होती,त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सरसकट २८ दिवसांचा संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र सध्या शेतीचे दिवस,लोकांमध्ये निर्माण होणारे सततचे वाद लक्षात घेता २८ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी हा कोरोनापेक्षा घातक ठरल्याने आणि मुंचकुंदी विकास परिसर संघ लांजा-राजापूर या संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीची मागणी केल्याने या कालावधीत स्थितीलता आणण्यात आली आहे.त्यामुळे मुंचकूंदी परिसर विकास संघटनेने जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे आभार मानले आहेत.


   चौथ्या लाकडाऊनमध्ये बरेचसे रोजगार सुरु करण्यास सरकारने सांगितले असताना कोकणातील शेतकरी वर्ग मात्र २८ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीमुळे वंचित राहणार होता.शेतीची काम सुरु होण्यास काही दिवस असल्याने चाकरमान्यांना स्वताच्या शेतात कामे करण्यासाठी सवलत द्यावी अशी विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती.त्यामुळे कोकणचा राजा म्हणून नावाजलेल्या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही याकडे लक्ष देणे महत्वाचे होते.कोविड -१९ बाबत गाव कृती समिती  आरोग्य यंत्रणाकडून सध्या होत असलेल्या पाठपुरावा,धडपड याच तळमळीने जर का या आधी जिल्ह्यातील आरोग्य सेवा चांगली करण्यासाठी वापरली असती तर आज सरकारी यंत्रणेवरील  भार नक्कीच कमी होण्यास मदत झाली असती.


  जागतिक आरोग्य संघटनेने ७ दिवस आणि महाराष्ट्र राज्य शासनाप्रमाणे १४ दिवस होम क्वारंटाइनचा नियम आहे.आणि लांजा-राजापूर मधील गावात असलेल्या चाकरमान्यांवर लादण्यात येत असलेल्या ४२ दिवस(१४ दिवस संस्थात्मक व २८ दिवस होम) कालावधी करण्यात आला होता.त्यामुळे गावागावात विटाळपणा,शेतीचा प्रश्न,अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत.कोणी मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांकडे ढुंकूनही पहायला तयार नाही.त्यामुळे यात १४ दिवसाचा क्वारंटाइन कालावधी करण्याची नितांत गरज होती.अखेर मुचकुंदी परिसर विकास संघटना लांजा-राजापुर या संघटनेच्या विनंतीस मान देवून रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन २८ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांवर आणला आहे.यातून त्यांनी चाकरमान्यांना एक मोठा दिलासा दिला आहे.गावागावात चाकरमान्यांवर होणारा अन्याय कमी होईल त्यामुळे जनतेने आभार मानले आहेत.


  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावागावातील ग्रामकृतीदलांना लेखी आदेश पाठविले आहेत.मुंबईतून येणारे चाकरमानी यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे १४ दिवस क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे.मात्र १४ दिवसानंतर कोणतीही लक्षणे दिसल्यास आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरीत कळवायचे आहे.पुढील काळावधीत शेतीची कामे सुरु होत असून शेतकरी १४ दिवसानंतर शेतीत जावू शकतो.मात्र कोणत्याही गर्दीत जाणे टाळावयाचे आहे.सर्वांनी स्वयंशिस्तीला प्राधान्य दिले पाहीजे.



  • श्री भांड,गटविकास अधिकारी,लांजा पंचायत समिती,लांजा


टिप्पण्या