दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले डॉक्टराना पी.पी.ई किट चे वाटप


दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले डॉक्टराना पिं.पी.ई किट चे वाटप. 


दापोली (प्रतिनिधी) येथील रविवार दिनांक २४ मे २०२० रोजी मनसे नेते अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.आमदार मा. श्री. नितीनजी सरदेसाई साहेब यांच्या माध्यमातून दापोली मधील डाॅक्टरांना पिं.पी.ई किट चे वाटप करण्यात आले.


कोरोना संसर्गजन्य विषाणू रोगाचा प्रसार रोखण्यासाठी डाॅक्टर अविरतपणे कार्यरत आहे. हे काम करतांना त्यांचा कोरोना रूग्णांशी व जनतेशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डाॅक्टर श्री. प्रशांत मेहता, डाॅ. श्री. तुषार भागवत, डाॅ. श्री. शिशीर भाटकर, डाॅ.श्री. पर्टवधन, डाॅ. श्री. मुनिर सरगुरो, डाॅ. श्री. महेश भागवत,डाॅ.श्री. कुणाल मेहता, डाॅ.बनसोडे, डाॅ. श्री.वसंत मेंहेदळे, या डाॅक्टर्सना पी.पी. ई. किट वाटप करण्यात आले.


याप्रसंगी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर साहेब, मनविसे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष तथा मा. नगरसेवक  श्री.सचिन गायकवाड, श्री. देवकाते सर, दापोली तालुकाध्यक्ष श्री. नितीनजी साठे, दापोली शहराध्यक्ष श्री. राकेश माली, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष श्री. अरविंद पुसाळकर ,तालुका सचिव मयुर कांते, मनविसे तालुकाध्यक्ष साई देसाई, रोहित शिंदे,विभाग अध्यक्ष श्री. सुजित गायकवाड,जयेश गुहागरकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर, प्रदिप भोसले इत्यादी मंडळी उपस्थित होती.


टिप्पण्या