उत्तम काम करणाऱ्या कृतीदलांचा होणार सन्मान, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची संकल्पना


उत्तम काम करणाऱ्या कृतीदलांचा होणार सन्मान,जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण यांची संकल्पना


रत्नागिरी (प्रतिनिधी) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत असून कोरोनाची लागण होऊन आलेल्यांची संख्या वाढत आहे.मात्र कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी गावागावातील,शहरातील उत्तम काम करणाऱ्या कृती दलांना कोरोना लढा सन्मान देऊन  गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.यासाठी जिल्हास्तरावर २ लाख तर तालुकास्तरावर १ लाख ५० हजार,२५ हजार आणि मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.


या उपक्रमामुळे कृती दलाला प्रोत्साहन मिळणार आहे.तसेच गावात उत्तमप्रकारे काम सुरु राहील.एक सिस्टम डेव्हलप होईल.लोकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जनजागृती निर्माण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.अशा प्रकारे गावातील लोकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच मनोबल उंचावणारा  बहुधा रत्नागिरी जिल्ह्यातील तथा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचे दिसून येत आहे.


या स्पर्धेसाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत.मुंबईवरुन आलेल्या प्रवाशांची सौदार्हपुर्ण वागणुक,कोरोना कारणास्तव कोणताही वाद,भांडणे,व कायदा सुव्यवस्था स्थिती न बिघडवणे,बाहेरुन आलेल्या व्यक्तींना पुरविण्यात आलेल्या सुविधा,अंगणवाडीसेविका,आरोग्य कर्मचारी यांनी दिलेल्या वेळोवेळी भेटीच्या नोंदी,सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी,जनजागृतीसाठी केलेले विशेष प्रयत्न,अत्यावश्यक सेवासुविधा पुरवठा व वितरण,बचतगटांची मदत आदी १५ निकष ठेवण्यात आले आहे.३० जूनला निवड समिती पुरस्काराची निवड करणार आहे.


१५ जूनपर्यंत ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेने स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्वयंमुल्यमापन अहवाल तहसिलदार यांच्याकडे सादर करायचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे.गावांना थेट निधी देवून मदत करण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न आहेच.मात्रे या कोरोना काळात एक प्रोत्साहन देण्यासाठी आगळी स्पर्धो घेण्याचा विचार आला जेणेकरुन गावांमध्ये अधिक उत्तम काम होईल असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.हा उपक्रम नागरिकांमध्ये सलोखा राखण्यासाठी एक वेगळी दिशा देईल असेही त्यांनी सांगितले.


टिप्पण्या