शिवसेना दिवा उपशहरप्रमुख गणेशशेठ मुंडे यांच्यावतीने  दिव्यातील १५ हजार नागरीकांना अन्नधान्न वाटप



दिवा (वार्ताहर) ठाण्यातील दिवा प्रभाग समितीतील नगरसेविका सौ.सुनिताताई मुंडे आणि शिवसेना दिवा उपशहरप्रमुख श्री गणेशशेठ मुंडे यांच्यावतीने येथील गोरगरीब,मजुर यांच्यासह प्रभागातील सोसायटी,चाळीतील सर्वच कुटूंबियांना अन्नधान्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
   करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजल्याने 17 मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यामुळे दिवा शहर भागातील हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंडे कुटूंबिय पोलिस यंत्रणांना व विविध सोसायटीतील रहिवाश्यांना,दिव्यातील विविध  गोरगरीब नगरवस्तीमध्ये जाऊन अन्नधान्याचे आणि सेप्टी किटचे वाटप करीत आहेत. 
  22 मार्च पासून नगरसेविका सौ.सुनिताताई मुंडे आणि दिवा शिवसेना उपशहरप्रमुख श्री गणेशशेठ मुंडे हे कुटूंबिय दिव्यातील गणेशपाडा,गणेशनगर,बेडेकरनगर,मातोश्रीनगर,म्हात्रे गेट,धर्मवीर नगर,संतोषनगर,वक्रतुंडनगर,श्लोकनगर,राजनगर,म्हसोबा नगर आदी ठिकाणांतील चाळीतील रहिवासी आणि सोयटीतील नागरीकांना सरसकट अन्नधान्याचे वाटप करीत आहेत.या मदतीबद्दल विविध भागातील नागरीकांनी मुंडे कुटूंबियांचे आभार मानले आहेत.


नगरसेविका सौ.सुनिताताई मुंडें यांच्या दातृत्वाला सलाम


 नगरसेविका सौ.सुनिताताई मुंडें यांच्या दातृत्वाला सलाम करण्यात येत आहे.ताईंनी ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात येणारे नगरसेविकेचे गेल्या अनेक वर्षाचे मानधन त्यांनी स्वतासाठी खर्च न करता गोरगरीब,गरजू नागरीकांना अन्नधान्याची सोय व्हावी म्हणून खर्च करीत आहेत.त्यांच्या या विषेश कार्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आहे.
  अन्नधान्याचे वाटप करताना शारीरिक अंतराची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात येईल यासाठी शिवसेना दिवा उपशहरप्रमुख श्री गणेशशेठ मुंडे विशेष काळजी घेत आहे. प्रभागात मदतकार्य राबवितानाच अडलेल्या नागरीकांना आपल्या गावी जाण्यासाठी तात्काळ मदत करणे,त्यांच्या समस्या सोडविणे,त्या जाणून घेणे यासाठी गणेशशेठ मुंडे स्वत लक्ष घालीत आहेत.अन्नधान्याचे वाटप करताना त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे,ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी,दिव्यातील युवा नेते विपुल मुंडे यांची मदत होत आहे.मदतीचे वाटप करण्यासाठी शिवसेनेचे अत्यावश्यक सेवेतील अनेक कार्यकर्ते दिवसरात्र राबत आहेत.
   नागरीकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.कोणी अडचणीत असतील तर शिवसैनिक तुम्हाला तातडीने मदत करतील.मला स्वतःला फोन करा.माझ्या दिव्यातील नागरीकांना कोणतीही अडचण येणार नाही.शिवसेनेचे कार्यकर्ते त्यासाठी सतत प्रयत्न करतील असे श्री गणेशशेठ मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.


टिप्पण्या