साबिक इंडिया व मिशन फॉर व्हिजन संस्थेतर्फे दोन हजार मजुरांना ड्राय कीटचे वाटप
मुंबई प्रतिनिधी (विनोद चव्हाण) देशभर कोरोन विषाणूंच्या प्रादुर्भावा मुळे आज सर्वत्र भिषण परिस्थती निर्माण झाली होती. अनलॉक १ मध्ये सामान्य माणसाचे जगण्याचे फार हाल झाले होते. श्रमिक ट्रेन सुरु असल्याने मुंबई मधून बरेच मजूर स्वगृही परतत होते अशावेळी विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने मुंबई लोकमान्य टीळक रेल्वे स्थानका वरून पटना एक्प्रेस, पाटली पुत्र या ट्रेनने जाणाऱ्या दोन हजार प्रवाशांना दोन दिवस प्रवासमध्ये पुरेल एवढे ड्राय कीटचे मोफत वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रामधील वाढता कोरोनाच्या (कोविड -१९) पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले. डेली वेजेसवर काम करण्याऱ्या जनतेला त्यामुळे हलाकीचे जीवन जगावे लागत आहे. मुंबई मधून गावी जाण्याकरिता सरकारने श्रमिक ट्रेन सुरु केल्या त्यामुळे मजुरांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन मुळे मजुरांच्या हातामधील कामाला पोरके झाले होते.कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. मुंबई मधील १० बाय १० च्या खोली मध्ये राहताना “सोशल डिस्टन्ससिंग” राखण्यास खूप संघर्ष करावा लागत होता त्यामुळे मुंबईतून स्वगृही जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, मिळेलत्या गाडीने गावी जाने हा पर्याय निवडला, प्रवास करताना हातात पैसे नसल्याने प्रवासात काय करावे हा प्रश्न मजूरांच्या कुटुंबा समोर उभा होता हि गरज लक्षात घेऊन विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेने लोकमान्य टिळक रेल्वे स्थानका वरून पटना, पटली पुत्र या ट्रेनने जाणाऱ्या दोन हजार प्रवाशांना दोन दिवस प्रवासमध्ये मदत होईल म्हणून दोन लिटर पाणी, जम्बो (८०० ग्राम) बिस्कीटपुडा, ५०० ग्राम चिवडा, दोन फ्रुटी, एक ब्रेड पॉकेट व अर्धा डझन केळी एवढे ड्राय कीटचे साबिक इंडिया व मिशन फॉर व्हिजन संस्थे सह्याने श्रमिक ट्रेन मधून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांला देण्यात आले.
मुंबई लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकवरून पटना, पटली पुत्र या ट्रेनने जाणाऱ्या दोन हजार प्रवाशांना दोन दिवस प्रवासमध्ये पुरेल एवढे ड्राय कीटचे मोफत वाटप करण्या करिता विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेचे अकाऊंट ऑफिसर महेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली कमलेश सामंततुल, निखील, सुनिल, योगेश, शौला, राहुल, संकेत, अविनाश, बाबासाहेब शेंडगे यांनी “सोशल डिस्टन्ससिंग” ठेऊन प्रवसी यांना मोफत कीटचे वाटप केले. स्थानिक रेल्वे प्रशासन व आर पी एफ जवान यांनी पण मोलचे सहकार्य केल्या बदल विसप्र संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा