अखंड मेहनत करुन सृष्टी मोरे हिने मिळविले 92.60 टक्के


मुंबई (प्रतिनिधी ) जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सृष्टी सुधीर मोरे या विद्यार्थीनीने दहावीच्या परिक्षेत 92.60 टक्के इतके गुण मिळविले आहे.त्यामुळे तिने आपल्या आईवडीलांच्या कष्टाचे पांग फेडले असे म्हणता येईल.


सृष्टी आपल्या आईवडीलांसह भांडूप येथे राहत आहे.आपल्या शाळेतील शिक्षक गीगी वर्गिसे,श्री स्वप्नील राणे यांच्या सहकार्याने आज दहीवीत चांगले गुण संपादित करुन महापालिकांमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचीही मानकरी ठरली आहे.तिच्या या यशाबद्दल सृष्टीचे आईवडील सुधीर राजाराम मोरे आणि साक्षी सुधीर मोरे तसेच शाळेतील शिक्षकांबरोबरच मोरे कुटूंबियांनी कौतुक केले आहे.


सृष्टी ही मुलूंड येथील सेंट मेरि कान्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थींनी आहे.तिच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.


टिप्पण्या