तीन महीन्याची वीजबिले माफ न केल्यास समाजसेवक अमोल केंद्रे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर करणार निषेध आंदोलन


लोकांच्या घरात पैसा,अन्न नसल्यामुळे करणार आंदोलन


ठाणे (प्रतिनिधी) राज्यात कोरोनाच्या संकटामुळे  टाळेबंदी चालु आहे.या परिस्थितीत महाराष्ट्रातील जनता घरातच अडकून पडली आहे.लोकांची गेल्या २२ मार्च 2020 पासून काम नसल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.त्यामुळे कोणताही उत्पन्नाचा मार्ग सध्या सामान्य जनतेकडे राहीला नसून राज्य शासनाने तीन महिन्याची वीजबिले माफ करावी यासाठी दिव्यातील समाजसेवक श्री अमोल केंद्र आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासमोरच निषेध आंदोलन करणार आहेत.


कोरोनाचे संकट दारावर उभे आहेत.गेल्या अनेक दिवसांची टाळेबंदीमुळे लोकांचे भाडे वाढले आहे.बिल्डींगचे मेंटनेंन्स पेंडींग आहे.घराच्या बाहेर पडायला शासनाची परवानगी नाही.हाताला काम नाही, धंदा नाही.असे असताना सामान्य,गरीब माणसांकडे पैसे येणार कुठून? केंद्र सरकार पुरवठा करीत असलेले तांदुळ अपुरे पडत आहे.दहा माणसात ५ किलो तांदुळही पुरेनासे झालेत.अन्न खायला लोकांकडे पैसे उरलेले नाही.जनता आता उसणवारीने  ज्यांच्याकडे पैसै आहेत त्यांच्याकडे मिळण्यासाठी हातपाय पसरित आहेत असे असताना ग्राहकांकडून लाईटचे बील वसुली करणे हे सध्याच्या कोणत्याच ग्राहकाला परवडणारे राहीले नाही.


कोरोना काळात टाळेबंदी आजही सुरु आहे.अनेकांकडे पैसेही संपत आले आहेत.टाळेबंदी पुढेही राहणार की उठणार याची शास्वती देता येत नाही.भाडे वाढल्याने घरमालकही तगादा लावत आहेत.बिल्डींगचे चेअरमन मेंटनेंन्ससाठी विचारणा करीत आहेत.काहीही कामधंदा नसताना एवढे पैसै आणायचे कुठूंन? अशी चिंता लागून राहीली आहे.त्यातच महावितरणचे बील आल्याने चिंतेत भर पडली आहे.कोरोना काळात अनेक देशांनी आपल्या नागरिकांच्या  खात्यात पैसे जमा केले आहे.परंतु महाराष्ट्र सरकारला असे करता येत नसले तरी त्यांनी वीज बील तरी माफ करा असे म्हणणे समाजसेवक अमोल केंद्र यांनी मांडले आहे.


   राज्यातील जनतेच्या घरात अनेक अंदाजपंची लाईट बीले येवून पडली आहेत. गेली अनेक दिवस घर बंद असूनही काहींची अव्वाच्या सव्वा बीले आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.महावितरणच्या कार्यावर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.शासनाने सरसकट सर्वांचीच तीन महिन्याची बीले माफ करावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर येत्या 25 जुलै रोजी निषेध आंदोलन करणार असल्याचे समाजसेवक अमोल केंद्रे यांनी सांगितले आहे.


टिप्पण्या