कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र


योग्य नियोजन करुन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची केली मागणी


ठाणे (प्रतिनिधी) कोकणातील चाकरमान्यांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव पुढील महिन्यात येत आहे.कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सणावर यावर्षी कोरोना संसर्गाचे सावट आहे.मात्र राज्य सरकार तसेच केंद्रसरकाने योग्य ती काळजी घेतल्यास गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना विशेष गाड्यांची उपलब्धता होईल या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.


कोकणातील एकमेव सण म्हणजे गणेशोत्सव आहे.या सणासाठी मुंबई,ठाणे,वसई-विरार,कल्याण,नवीमुंबई या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात.त्यामुळे कोरोना संकटामुळे कोकणातील चाकरमान्यांच्या आनंदावर विरजन नको म्हणून कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि रेल्वे गाड्यांचे नियोजन करुन कोकणात फक्त गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी केली आहे.


कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या


- कोकण दैनंदिन चार सत्रात (सकाळ,दुपार,सायंकाळी,रात्री) अनुक्रमे तीन,एक,एक,तीन अशा जलद रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात.


- कोकण रेल्वे मार्गावर हि सेवा मुंबई-दादर टर्मिनल,लोक टिळक टर्मिनल,दिवा जंक्शन,वांद्रे टर्मिनल,कल्याण जंक्शन,वसई जंक्शन या रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वे सेवा उपलब्ध असावी.


- कोकण रेल्वेवरील स्थानकापासून सावंतवाडी रोड स्थानकापर्यंतच सेवा देण्यात यावी.


- आरक्षित गाड्यांचे आरक्षण तिकीट विक्री ३५ दिवस अगोदरच उपलब्ध करावी.


- आरक्षण पद्धती दलालांवर कडक अंकुश ठेवूनच ओनलाईन टिकीट विक्री सेवा देण्यात यावी.


- आरक्षित गाड्यांबरोबर अनारक्षित गाड्यांची सेवा हि तितकीट उपयुक्त असल्याने ही सेवा उपलब्ध करावी.


- रेल्वे गाड्यांचे निर्जंतुकीकरण वेळोवेळी सुटण्याचे आणि अंतिम स्थानकांवर करण्याचे बंधनकारक करावेत.कोकण रेल्वेमार्गावर सर्व गाड्यांमध्ये तसेच कोकण रेल्वे स्थानकांवर अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांना कठोर निर्बंध वा मज्जाव (परवानगी नसावी) करण्यात यावा.


- उतारुंना कोकण रेल्वे स्थानकांवरुन गावात जाण्यासाठी राज्य परिवहनांची सेवा उपलब्ध करावी.


- कोकण मार्गावर धावणाऱ्या इतर जलद गाड्या ,रोरो सेवा,मालगाडी सेवा देताना रेल्वे मार्गावर गणपती विशेष रेल्वे सेवा वेळेतच द्यावी.


  राज्य शासन तसेच केंद्र शासनाने वरील मागण्याचा विचार करुन कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करावे असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


टिप्पण्या