मनविसे महिला पदाधिकाऱ्यांकडून ठाणे वस्तीगृहातील महिलांना फेसमास्क,सॅनिटरी पॅडचे वाटप


मनसेकडून वस्तीगृहातील महिलांना फेसमास्क,सॅनिटरी पॅडचे वाटप


ठाणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनविसे ठाणे शहर अध्यक्ष श्री अरुण घोसाळकर यांच्या पुढाकाराने  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून ठाण्यातील सौ मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेत तसेच ठाणे शहरातील महीला वसतीगृहात हॅन्ड सॅनिटाइझर्स,फेस मास्क,सॅनिटरी पॅड यांचे वाटप करण्यात आले.या कार्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे संस्थांच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत.


लॉकडाउनमुळे अनेक महिलांना बाहेर पडता येत नसल्याने त्या घरातच अडकून पडल्या आहेत. महिला वसतीगृहातील महिलांची मासिक पाळीची समस्या लक्षात घेऊन ठाण्यातील मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांमार्फत तेथील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून हॅण्ड सॅनिटाइझर,फेसमास्कचेही वाटप करण्यात आले.


यावेळी मनविसेच्या कोपरी उपशहर अध्यक्ष अंकिता सारंग,निलम भोईर, कळवा विभाग अध्यक्षा काजल डावखर, ठाणे विभाग अध्यक्षा पुनम सावंत आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


टिप्पण्या