लांजा देवराई येथील प्रकाश भोवड खून प्रकारणी देवरुख पोलीसांना मोठे यश,दोघांना अटक
देवरुख - आंबा घाटात १२ मार्च रोजी सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या खूनाची उकल करण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे.हा मृतदेह लांजा देवराई येथील प्रकाश भोवड यांचा होता.आसपास कोणताही पुराव नसताना केवळ मृताच्या अंगावरील शर्टावर असलेल्या लोगोच्या सहाय्याने पोलिसांनी याची उकल केली.
या प्रकरणी रुपेश दयानंद कोत्रे आणि सतीश पालये(लांजा) यांना अटक करण्यात आली आहे.यातील रुपेश कोत्रे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर विविध 14 गुन्ह्यांची नोंद आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डा.प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी निवास सांळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निशा जाधव,स.पो.नि.तुषार पाचपुते,शरद पवार,श्री चौधर,हेड कान्स्टेबल भुजबळराव,पोलीस नाईक बरगाले,सडकर,तडवी,जोयशी पवार यांनी या प्रकरणी छडा लावला.याप्रकरणी अधिक तपास देवरुख पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा