लांजातील वेरळ ग्रामस्थ मंडळ मुंबईच्यावतीने गावातील एक हजार ग्रामस्थांना केले मास्क,सॅनिटाइझर आणि फेसमास्कचे वाटप
वेरळ ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने गावात मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करताना मंडळाचे
अध्यक्ष संजय डाकवे, उदय जाधव, सुरेश घडशी व अन्य पदाधिकारी
लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ ग्रामस्थ मंडळ मुंबई तर्फे वेरळ गावातील सुमारे एक हजार लोकांना स्वखर्चाने मास्क, सॅनिटायझर आणि फेस शिल्ड चे घरपोच वाटप केले. कोरोनाच्या महामारी मध्ये मुंबई ला राहूनही गावातील लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवित त्यांनी जोपासलेल्या या बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मंडळाचे अध्यक्ष संजय डा कवे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे उदय जाधव, सुरेश घडशी,चंद्रकांत बागवे,दीपक डाकवे,सचिन शिदे,अतीस शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंडळाच्या या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
गेल्या पाच महिन्यांपासून को रोना ने जगभरामध्ये थैमान घातले आहे. को रोना महामारी च्या विरोधातील लढ्यामध्ये शासनासह विविध सामाजिक संस्थाही उतरल्या आहेत. त्यामध्ये तालुक्यातील वेरळ येथील वेरळ ग्रामस्थ मंडळ मुंबई या मंडळाचा समावेश आहे .गावातील सुमारे एक हजार लोकांना स्वखर्चाने घरपोच मास्क, सॅनिटायझर आणि फेशियल शिल्ड चे वाटप करण्यात आले.
कोरोना च्या महामारी मध्ये मुंबईला राहवूनी गावातील लोकांची सुरक्षा घेण्यासाठी योगदान देणाऱ्या वेरळ ग्रामस्थ मंडळ मुंबई या मंडळाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे काशिनाथ जाधव यांनी कौतुक केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा