रामनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान
मुंबई (शांत्ताराम गुडेकर) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी जरी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला नसला तरी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यउत्सव साजरे करा या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक मंडळांनी आरोग्य उत्सव साजरा करत या दहा दिवसांत विविध आरोग्यविषयक शिबिरे आयोजित केली.अशी शिबिरे आयोजित करुन मंडळांनी एक प्रकारे सामाजिक दायित्व जपण्यास हातभार लावलेला आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर गोरेगाव पूर्व यांच्यावतीने देखील यावेळी गणेशोत्सवाच्या काळात गरजू कुटुंबांना धान्यवाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,आरोग्य शिबीर घेतली.मंडळाने रक्तदान शिबिराचे मीनाताई ठाकरे ब्लड बँकेच्या माध्यमातून शिवसेना शाखा क्र ५४ येथे आयोजन केले होते.या शिबिरात एकूण ८३ रस्क्तदात्यांनी रक्तदान केले.महिला शाखाप्रमुख शीलाताई राठोड,शाखाप्रमुख अजित भोगले,मंडळाचे सचिव प्रसाद कदम यांनी देखील रक्तदान केले. विशेष म्हणजे यावेळी महिलांचा सहभागही उत्स्फूर्त होता.रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर, मास्क,झी मराठी दिशा सुखकर्ता अंक,आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी वैयक्तिक ३० व्या वेळी रक्तदान केल्यामुळे त्यांचा मंडळाच्यावतीने खास सत्कार करण्यात आला.मंडळाचे यंदा उत्सवाचे ४८ वे वर्ष असून दोन वर्षांनी सुवर्णमहोत्सवी वर्षनिमिताने ५० सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येणार असल्याची माहिती सचिव प्रसाद कदम यांनी दिली.यावेळी अध्यक्ष सुनिल सुतार,खजिनदार सुशील धुमाळ,सहसचिव सचिन चव्हाण,दत्ताराम सावंत व उपविभागप्रमुख प्रवीण माईनकर आणि शाखाप्रमुख अजित भोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा