शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्याहस्ते ७०० कर्मचारी वर्गाची शारीरिक तापमान तपासणी व मास्क,सँनिटायजर,हँडवाँश व साबणचे वाटप
मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) संसदीय कार्य व परिवहनमंत्री अँड. डॉ. अनिलजी परब यांच्या सूचनेनुसार अदानी इलेट्रिकल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी छोटीशी मदत म्हणून शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष कुणाल सरमळकर तसेच सरचिटणीस संजय ब्रीद, कार्यध्याक्ष -रवी कृष्णन, उपाध्यक्ष तुलशी राठोड पेरूमल, सत्त्या वेडीवल यांनी कांदिवली (पश्चिम), शंकर लेन (नॉर्थ झोन) येथे २०० कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर मास, डेटॉल हॅन्डवॉश आणि साबण देऊन सर्व कामगारांचे शारीरिक तापमान तपासण्यात आली.तसेच जे. बी. नगर, चकाला(साऊथ झोन), अंधेरी (पूर्व) येथे २०० कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर मास, डेटॉल हॅन्डवॉश आणि साबण देऊन सर्व कामगारांचे शारीरिक तापमान तपासण्यात आली.याशिवाय चेंबूर टिळकनगर (ईस्ट झोन) येथे ३०० कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर मास, हँड ग्लोज, डेटॉल हॅन्डवॉश आणि साबण देऊन सर्व कामगारांचे शारीरिक तापमान तपासण्यात आले.शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आलेले साहित्य व तपासण्या या उपक्रमाचे कामगार वर्गाकडून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा