धुळे येथील अभाविप कार्यकर्त्यांवर झालेला हल्ल्याचा निषेध नोंदवत रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाचे रत्नागिरी तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी (ह्रषिकेश विश्वनाथ सावंत) अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारा केला याचा निषेध नोंदवत पालकमंत्री अब्दुल सत्तार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा ही मागणीही करण्यात आली. कोरोनामूळे मागील पाच महिन्याच्या काळामधील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील महाराष्ट्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्यांबाबतही विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, तालुकाध्यक्ष ऋषिकेश कोळवणकर, शहराध्यक्ष विक्रम जैन, भाजपा सरचिटणीस बाबू सुर्वे सोशल मीडिया संयोजक धनंजय पाथरे, निखिल बोरकर, पमु पाटील, निलांजन नाचणकर, संकेत बापट, डॉ.हृषिकेश केळकर, एडवोकेट अनिश पटवर्धन, पत्रकार हृषिकेश विश्वनाथ सावंत, हर्ष दुडे, आदित्य गोगटे, प्रसाद बाष्टये, अमन काझी, अमित चव्हाण, सौरभ लाड, इशा फाटक, बबलू शर्मा इतर सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT
निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे १) कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालकीची झाली आहे याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हाफत्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.२) अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे. ३) अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा