ग्रथ मंदिरे सुरू करा! :- रत्नागिरी नगर वाचनालायाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन


रत्नागिरी (हृषिकेश सावंत):- कोरोना  प्रकोप सुरू झाला आणि सर्वात प्रथम वाचनालये बंद झाली.वाचनालयात गर्दी होईल असा सकारात्मक विचार या मागे होता.  मात्र आज बहुतेक सर्व सेवा पूर्वपदावर आल्या आहेत मात्र वाचनालयाची  कुलपे  कायम आहेत.

    वाचक खूप अस्वस्थ आहेत. वाचनालये ही वाचकांसाठी मित्र नव्हे जिवलग आहेत. अश्या जिवलगा पासून वाचकांना साडेपाच महिने दूर राहावे लागले आहे.वाचक खूप वेळा अस्वस्थ होऊन फोन करतात वाचनालय सुरू का करत नाही? त्यावेळी त्यांना शासनाचा वाचनालये पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दाखवावे व आपली हतबलता प्रकट करावी लागते.

   ५ महिने वाचनालायचं उत्पन्न पूर्ण बंद आहे.मात्र पगार, लाईट बिल,पाणी बिल,  मेंटेनन्स आदी खर्च सुरू आहेत. वाचनालयाची ग्रंथ संपदा सुरक्षित ठेवण्याची कसरत करावी लागत आहे.

ADVERTISEMENT


  कोरोना च्या या महामारीत वाचनालये कालबाह्य  तर होणार नाहीत  ना?हा प्रश्न सतावत आहे.वाचनालये अचानक बंद झाली त्यामुळे वाचनालयातील सभासदांना वितरित केलेली पुस्तके सभासदांकडे ५ महिन्यापेक्षा जास्त काळ पडून आहेत. ही पुस्तके परत प्राप्त करण्याच आव्हान वाचनालयान समोर आहे.काही सभासद प्रामुख्याने विद्यार्थी, अन्य राज्यात स्थलांतरित झालेले सभासद यांच्याकडील पुस्तके प्राप्त करण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत.५ महिन्यात पुस्तके गहाळ होणे ,हरवणे हे प्रकार होणार हे नक्की, या मध्ये अनेक दुर्लभ ग्रंथसंपदा मुकावी लागणार ही भीती सतावत आहे.

    वाचनालयात  गर्दी होणार नाही . शिस्तीत पुस्तक वितरण होईल. जमा होणारी पुस्तके २४ तास स्वतंत्र ठेवली जातील. मास्क सेनेटायझर, सोशल डिस्टन्स राखले जाईल.कोणताही गर्दीचा, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम केला जाणार नाही.गरजे नुरूप जेष्ठ नागरिक वाचकांना घरपोच पुस्तके दिली जातील. या बरोबर शासनाला ज्या सुरक्षिततेच्या  उपाययोजना करणे आवश्यक वाटते  अश्या सर्व अटी शासनाने घालाव्यात ,पण वाचनालये आता सुरू करावीत.

 कोरोना संकट काळात बंद केलेली प्रत्येक गोष्ट सुरू करण्यासाठी आंदोलन अनिवार्य ठरवण्याच्या भूमिकेतून बाहेर येणं गरजेचे आहे. 

   धार्मिक संस्था सुरू करणाऱ्या शासनाने आता ग्रंथ मंदिरे तात्काळ सुरू करावीत.ग्रंथालये ही समाज मानसिकता सुदृढ ठेवतात. त्या त्या शहराची वैभव ठरणारी ग्रंथालये शासनाने दुर्लक्षित करू नये पुरोगामी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात  समृद्ध वाचनालयाची मोठी भूमिका शासनाने दुर्लक्षित करू नये .वाचकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये.  असा इशारा रत्नागिरी नगर वाचनालायाचे अध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांनी शासनाला दिला आहे.  महाराष्ट्रातील सर्व वाचनालये नियमित सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश शासनाने तात्काळ पारित करावेत अशी मागणी १९२ वर्षांच्या सर्वात जुन्या वाचनालयाचे अध्यक्ष  ऍड.दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

टिप्पण्या