युवा सेनेच्यावतीने गणेशोत्सव मंडळाला सॅनिटाइझरचे वाटप


मुंबई (प्रतिनिधी) युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री.सिद्धेश रामदास क़दम यांच्या तर्फे शिवसेना नगरसेविका सौ माधुरी योगेश भोईर यांच्या सहकार्याने विभागातील १६ श्री गणेशोत्सव मंडळांना मोफत सॅनिटायझर स्टॅंड, ५ लिटर सॅनिटायझर, थर्मल गन वाटप करण्यात आले.


सध्या जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रदान करण्यात आले.


यावेळी शाखा प्रमुख आत्माराम कांबळी,  शाखासंघटक सुरेखा मोरे, महेश दाभोलकर-विधानसभा चिटणीस, तेजस मेस्त्री- शाखाअधिकारी, कल्पेश कदम-भावीसे शाखाअधिकारी, उपशाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते  उपस्थित होते.


टिप्पण्या