मनसेच्या प्रभाग क्र- १९८ च्यावतीने वाटण्यात येणाऱ्या आरती संग्रहाचे हिंदूजननायक राज ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशन
मुंबई(शांत्ताराम गुडेकर/ समीर खाडिलकर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग १९८ आयोजित प्रभागातील गणेश भक्तांना गणेश चतुर्थी निमित्त आरती संग्रह देण्यात येणार आहे. या आरती संग्रहाचे प्रकाशन हिंदूजननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे सरचिटणीस व वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक, पक्षाचे नेते संदिप देशपांडे,वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी, महिला शाखा अध्यक्ष सौ. प्रियंका कांबळे, विभाग संघटक शारीरिक सेना हर्षल खरात,उपशाखा अध्यक्ष उमेश पुंगी, दिनेश निकम, किरण तावडे, विशाल खेडेकर, अवधूत घाडीगावकर, विक्रांत कोसंबी व अन्य पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.असे अमोल शशिकांत देसाई शाखा अध्यक्ष - १९८ संपर्क अध्यक्ष दोडामार्ग तालुका (सिंधुदुर्ग जिल्हा)यांनी बोलताना सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा