आधी डी.सी.पी.एस योजनेचा संपूर्ण हिशोब, मगच एन.पी. एस.फॉर्म भरण्याची प्रक्रिया राबवावी,महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांची मागणी


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली होती. डी. सी. पी. एस. योजनेची अंमलबजावणी मात्र २०१० सालापासून करण्यात आली.आता पुन्हा डी. सी. पी. एस. योजनेमधून एन.पी.एस.योजनेमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.दिनांक २८ जुलै २०२० शिक्षण विभाग उपसचिव यांनी आयुक्तांना पाठविलेल्या शासन परिपत्रकानुसार सर्वात आधी सर्व नवीन पेंशन धारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी सी पी एस कपात रक्कम, शासन वाटा, त्यावरील व्याज याबाबत हिशोब व पोचपावती देण्यात याव्यात असे सांगितले असूनही हिशोब व पोचपावती न देता  एन पी एस फॉर्म भरण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे मुंबई विभाग संघटक युवराज कलशेट्टी यांनी सांगितले.सर्वात प्रथम दिनांक १ नोव्हेंबर २००५ ते ३१ऑगस्ट २०२० पर्यंतचा डी. सी. पी. एस. चा हिशोब व पोचपावती सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात व प्रलंबित सातव्या वेतन आयोग थकबाकीचा पहिल्या हफ्त्यात कपात केली गेलेली डी. सी.पी. एस. रक्कम नेमकी डी. सी. पी. एस.खात्यात जमा होणार की एन.पी.एस खात्यात जमा होणार यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने केली आहे.१९८२ची जुनी पेंशन योजना सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई कायम प्रयत्नशील राहणार असुन इतकी वर्षे लढा डी. सी. पी.एस विरोधात होता, आता यापुढील लढा हा एन. पी. एस विरोधात असणार असल्याचे तानाजी कांबळे यांनी सांगितले.

टिप्पण्या