मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध ! - श्री चेतन राजहंस


ठाणे -  मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या निष्पाप साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होताचार वर्षे अकारण कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयाने सनातनच्या या सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले होतेयाविषयीच्या अपिलावर सुनावणी करतांना आज मामुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहेआम्ही न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करतोया निकालामुळे सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेभगवा आतंकवादाचे मिथक प्रचारित करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे


टिप्पण्या