24 डिसेंबर पर्यंत युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांमार्फत आवाहन
ठाणे ( प्रतिनिधी ): जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याबाबत योजना कार्यान्वित केलेली आहे. युवक कल्याण क्षेत्रात युवा विकासाचे कार्य करणाऱ्या युवांसाठी तसेच संस्थासाठी जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोदणीकृत संस्था यांना देण्यात आहे.
युवक व युवतीचे वय 35 वर्षाच्या आत असावे. ठाणे जिल्हयात सलग 5 वर्ष वास्तव्य असावे. कार्याचे सबळ पुरावे आवश्यक आहेत. पुरस्कार दिल्या नंतर दोन वर्षे क्रियाशील राहणे आवश्यक आहे. संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी व किमान 5 वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे संस्थाचे कार्य स्वयंस्पुत्तीने केलेले असावे.
युवा विकासाचे कार्य युवा व संस्थांनी 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 व 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीसह गत तीन वर्षातील सर्वोत्कृष्ट बाबीची कामगिरी विचारात घेतली जाईल, तरी संबधितांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दि. 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , जिल्हाधिकारी परिसर कोर्ट नाका जवळ, ठाणे या ठिकाणी दाखल करावेत. सदर प्रस्ताव तयार करण्यासाठी काही मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते श्री. अजित कारभारी भ्रमणध्वनी ९५९४४२८४७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती स्नेहल सांळुखे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा