दिव्यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने वीजबिलांची होळी करीत सरकारचा केला निषेध


ठाणे(प्रतिनिधी)वीज बिलात सवलत देण्यास नकार देणाऱ्या निर्दयी राज्य सरकार चा निषेध करण्यासाठी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा दिवा अध्यक्ष अँड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवा चौकात वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.


राज्यसरकारने लाकडाऊन काळात आलेले वीजबील 100 युनिटपर्यंत माफ करतो असे आश्वासन दिले होते.मात्र प्रत्यक्षात वेळ मारुन नेत या सरकारने राज्यातील जनतेची मोठी फसवणुक केली आहे.असे राज्यसरकारवर आरोप लावत आज भारतीय जनता पक्ष दिवा विभागातर्फे दिवा चौकात वीजबिलांची होळी करण्यात आली.


 यावेळी भाजपा शहर कार्यकारणी सदस्य अशोक पाटील, रोहिदास मुंडे, भाजपा दिवा सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.अर्चना पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, मंडळ उपाध्यक्ष अंकुश मढवी, कमलाकर पाटील, रमेश यादव, हरिशंकर शर्मा, प्रकाश पाटील, अनुराज पाटील, महिला मोर्चा विभागीय सचिव सौ सुप्रिया भगत, मंडळ सचिव चंद्रकांत मोरे, जितू गुप्ता, प्रदीप घाडीगांवकर, आनंदा पाटील, युवा सरचिटणीस कपिल रोडे, अशोक सोळंकी, प्रसाद भोईर, नितीन चव्हाण, क्रांती सिंग संजू कानोजिया, रोहित ओझा व इतर पदाधिकारी व दिवेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या