घर मोडकळीस आले तरी भांबेड ग्रामपंचायत ह्द्दीतील लांबोरे कुटूंबिय घरकुल योजनेपासून वंचित


लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील भांबेड ग्रामपंचायत हद्दीतील दारीद्ररेषेखाली जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष कै. संजय लांबोरे यांचे दि. २९ ऑक्टोबर सर्पदंशाने निधन झाले खरे मात्र, ते पुर्वी कठीण परिस्थितीत मोडकळीस आलेल्या घरात कुटूंबासहीत राहत असल्याचे चित्र समोर येत आहे.एकीकडे केंद्र सरकार दारिद्ररेषेखालील कुटूंबियांना हक्काचे स्वतचे,पक्के घर मिळावे म्हणून ग्रामपंचायतींना निधी पुरवित असताना मात्र भांबेड ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या लांबोरे कुटूंबिय घरकुल योजनेपासून वंचित राहील्याचे दिसून येत आहे. भांबेड ग्रामपंचायतीने लांबोरे कुटूंबियांना तातडीने घरकूल मंजूर करावे अशी मागणी तालुकाभरातून होत आहे. 


कै. संजय लांबोरे यांचे दि. २९ ऑक्टोबर सर्पदंशाने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटूंबात वयस्कर वडील, पत्नी व दोन लहान मुले हयात आहेत. घरातील एकमेव कमावत्या पुरषाचे अचानक निधन झाल्याने कुटूंबाचा भार पेलणार कसा असा प्रश्न उभा आहे. कै. संजय लांबोरे यांचे साधे कच्चे घर असून सध्या हे घर कुटूंबाला राहण्यासाठी धोकादायक आहे.कच्चे घर असताना आणि लांबोरे कुटूंबिय दारिद्र रेषेखालील असताना ग्रामपंचायतीने अजून या कूटूंबियांना घरकुल योजनेतून घरासाठी मदत का केली नाही असा प्रश्न आता तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.


लांबोरे कुटूंबियांना आर्थिक मदतीची गरज


कुटूंबाचा कर्ता अचानक निघून गेल्याने व राहाण्यासही योग्य निवारा नसल्याने तसेच घरी अन्नधान्याची टंचाई असल्याने अनेक संकटांचा सामना करत कै. संजय लांबोरे यांचे कुटुंब जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. कै. संजय लांबोरे यांच्या संकटग्रस्त कुटूंबाला आधाराची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी थोडाफार मदतीचा हातभार लावल्यास कै. संजय लांबोरे यांच्या कुटूंबाला आधार देऊन त्यांना आपण आनंद देऊ शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे.


टिप्पण्या