ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची दिवसाढवळ्या हत्या, आरोपी फरार
ठाणे : ठाणे शहरात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून मनसेचे पदाधिकारी जलील शेख यांची हत्या करण्यात आली असून संपुर्ण ठाणे शहर हादरले आहे.जमील हे बाइकवरून निघाले असताना त्यांच्यावर मागून एक गोळी झाडण्यात आली. ही गोळी वर्मी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.या हत्येनंतर मात्र ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे येथील राबोडी परिसरात भरदुपारी ही धक्कादायक घटना घडली. जमील शेख हे बाइकवरुन निघाले असताना पाठीमागून बाइकवरून आलेल्या दोन जणांपैकी बाइकवर मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी डोक्याच्या आरपार गेल्याने जमील हे बाइकसह खाली कोसळले. हा प्रकार पाहून तेथे आजूबाजूला असलेले सगळेच हादरले. त्यानंतर तातडीने जमील यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच जमील यांचा मृत्यू झाला. जमील हे मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष होते. जमील यांच्यावर गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचवेळी आरोपींचा गुन्हे शाखेकडूनही शोध घेण्यात येत आहे. शवविच्छेदनासाठी जमील यांचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे येण्याची शक्यता आहे.
ठाण्यात क्लस्टर विरोध केला म्हणून जमील खान यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या हा धोक्याचा इशारा आहे
क्लस्टर योजना ही बिल्डरांच्या, अधिकाऱ्यांच्या व राजकीय नेत्यांच्या फायद्याची आहे, ती जनतेच्या फायद्याची करण्यासाठी या योजनेत, आराखड्यात आणि नियमांत खूप बदल करावे लागतील. पण ठाण्यात बिल्डरांचे राज्य आहे, त्यांना राजकीय नेत्यांचा व अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे हे उघड वास्तव आहे, त्यामुळे आज झालेल्या हत्येमुळे क्लस्टर योजना ठाण्यात राबवताना ती आहे तशी राबविली आणि कोणी सामान्य भाडेकरूने विरोध केला तर त्याचा मुडदा पाडला जाईल असा उघड इशारा आम्हाला मिळाला आहे... तरीही क्लस्टर मधील चुकीच्या आराखड्याला, नियमांना ठाणे मतदाता जागरण अभियान विरोध करणार व क्लस्टर योजना जनतेच्या लाभासाठी, फायद्यासाठी राबविले जाईल ही आग्रहाची मागणी आम्ही करीत राहू... प्रशासनाने या हत्येची गंभीर दखल घेऊन क्लस्टर योजना पारदर्शी करावी व जनतेने दिलेल्या हरकती, सूचना अंमलात आणाव्या अन्यथा क्लस्टर योजना आहे तशी राबविली आहे तशी राबविली तर भविष्यात ठाण्यात खून खराबा होईल अशी भीती आम्ही जागरूक नागरिक व्यक्त करीत आहोत.
उन्मेष बागवे, अध्यक्ष ठाणे मतदाता जागरण अभियान
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा