आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे आपुलकीची दिवाळी कार्यक्रम आश्रमात साजरा
रायगड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत रायगडकर सेवा प्रतिष्ठानने या वर्षीही रविवार दिनांक २२/११/२०२० रोजी आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे आपुलकीची दिवाळी हा कार्यक्रम जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित बेघर मुलांची आश्रम शाळा, म्हसकळ-टिटवाळा येथील बालगोपाळांसोबत स्नेहभोजन आणि खाऊवाटप करून हा कार्यक्रम केला.
त्यासोबतच आश्रमाच्या आजुबाजुचा परिसरात साफसफाई करून स्वच्छता अभियानही राबऊन लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आपल्या बदलापूरहुन आलेल्या श्री.आनंद विशे यांनी कोळीगीते सादर करून आश्रमातील मुलांचे मनोरंजन केले. त्यांच्या सोबतच मुलांनीही श्री. विशे साहेबांच्या तालावर उत्तम ठेका धरून उत्तम नृत्य सादर केले. आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण का होईना पण एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. या सत्कार्यामध्ये ज्या शिवसेवकांनी यथाशक्ती देणगी स्वरुपात मदत केली आहे. आशा सर्व शिवसेवकांचे आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटने तर्फे मनःपुर्वक आभार मानण्यात आले. आपल्या सर्वांचे प्रेम सहयोग आणि मार्गदर्शन असेच आम्हा सर्वांस लाभत रहावे. आपण संघटनेच्या माध्यमातून सेवेस सदैव तत्पर राहु हि विनंती श्री.मंगेश गोविंद मोरे अध्यक्ष आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान यांनी केली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा