दिवा स्थानकात उपनगरी रेल्वे प्रवाशी संघ आणि रेल्वे प्रवासी संघटनेची निदर्शने,सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची केलीय मागणी
ठाणे (प्रतिनिधी) रेल्वेतून सामान्य जनतेला प्रवास करण्यास मिळत नसल्याने सर्वांचे हाल होत आहे.त्यामुळे सर्वांसाठी लोकल सेवा सुरू कारवाई या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज दिवा रेल्वे स्थानकात निदर्शनं करण्यात आली.
आज देशातील सर्वच क्षेत्रात अनलॉकची प्रक्रीया वेगाने पूर्ण होत आहे.अशा परिस्थितीत mmr क्षेत्राची जीवनवाहीनी असलेली लोकल सेवा महिलां प्रमाणेच पुरुष प्रवाशांना ही अंशता सुरु करणे गरजेचे व शक्य होते. मात्र राज्य शासनाची निर्णय क्षमता व इच्छाशक्ती कमी पडत असल्याने सामान्य कष्टकरी वर्ग यापासून वंचित झाला आहे. यामुळे आज अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी सांगितले. यावेळे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, महिला प्रतिनिधी लता अरगडे, सौ सुमती गायकवाड, सौ पांजणकार, प्रसाद भोईर, आनंदा पाटील, रोशन भगत, जितू गुप्ता, चंद्रकांत मोरे, संतोष गुप्ता, अँड किरण भोईर, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाला केलेल्या मागण्या देखील उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. त्या खालील प्रमाणे; सामान्य पुरुष प्रवाशांना,लोकल सेवा अंशता किंवा पूर्णता परंतु तात्काळ खुली करावी.,दूध विक्रेते भाजी विक्रेते,मछी विक्रेते याना लोकल प्रवास मुभा असावी, अधिस्वीकृती धारका व्यतिरीक्त सर्व माध्यमांच्या सर्व पत्रकारांना लोकल प्रवास मुभा द्यावी अशा अनेक विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा