रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष श्री महेबुब शेख यांचे रत्नागिरीमध्ये स्वागत
रत्नागिरी (हृषिकेश सावंत):- रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांना बळ देताना तसेच युवकांचे प्रश्न सोडवताना राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात युवकांच्या माध्यमातून बळकट कशी होईल आणि पक्ष वाढीसाठी गाव तिथे राष्ट्रवादी कशी नेता येईल या साठी संपुर्ण जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा बैठक प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष श्री महेबुब शेख उपस्थित होते.
श्री.महेबूब शेख यांचे रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जंगी स्वागत करण्यात आले.या वेळी राष्ट्रवाद युवक काँग्रेस तर्फे स्वागत करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू, प्रदेश सरचिटणीस श्री अजयशेठ बीरवटकर,प्रदेश सरचिटणीस डॉक्टर चाळके,जिल्हा प्रभारी श्री उदय जावके, जिल्हा युवक अध्यक्ष श्री योगेश शिर्के, युवती अध्यक्ष दिशा दाभोळकर,जिल्हा युवती उपाध्यक्षा सिमीन हकीम, रत्नागिरी युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर,उपाध्यक्ष नागेश जागुष्टे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष संकेत देसाई,विद्यार्थी शहर अध्यक्ष साईजीत शिवलकर, रोहित मयेकर,ऋषिकेश मयेकर जिल्हा युवक चे पप्पु तोडणकर सुरज शेट्ये,राकेश मिंडे, मिहीर चव्हाण, संकेत कदम, सुमित कोकाटे,संकेत मुळे,संदीप रहाटे,दादा भाटले,रवींद्र साळवी, राजा शिवलकर व्यापारी संघटनेचे सुदेशजी मलुष्ट्ये यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा