वसई दुर्ग दीपोत्सव उत्साहात साजरा ,२१०० दिव्यांनी उजळला वसई किल्ला


मुंबई : (विशाल मोरे ) धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१००० मराठे हुतात्मा झाले. आपल्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले. स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई - विरार शहर,  घरे, दुकाने,  मंदिर , चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला (नागेश महातीर्थ) मात्र अंधारात असतो. पूर्वापार अनेक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थावर दीपावली साजरी करतात.
मराठा सैन्यामुळे, भारतीय जवानांमूळे व कोव्हिड योध्यांमूळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी टीम "आमची वसई" ने दर वर्षी प्रमाणे वसई किल्ल्यात दिपोत्सव साजरी करण्याचे ठरविले.  दिपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून भव्य आकाश कंदिल उजळवण्यात आला. मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात व जय वज्राई-जय चिमाजी च्या जयघोषात अवघे वातावरण दुमदुमले होते.  
फेथांध पोर्तुगीजांना जसे छत्रपतींच्या वीर मराठा सैन्याने वसईतून समूळ खणून काढले तसेच कोव्हिड योध्यांच्या प्रयत्नाने व सामान्य जनतेच्या सहकार्याने चायना व्हायरस भारतातून समूळ नष्ट होवो या भावनेने व कोव्हिड योध्यांच्या सन्मानार्थ या वर्षीचा दीपोत्सव साजरा केला असे सांगत आमची वसई सदस्यांनी समस्त वसईकरांना दीपावलीच्या शुभेच्छा प्रेषित केल्या.


टिप्पण्या