दिवा प्रभागसमिती सभापतीपदी सौ.सुनिता गणेश मुंडे यांची बिनविरोध निवड,कार्यकर्त्यांत उत्साह


ठाणे (प्रतिनिधी) ठाणे महानगरपालिकेच्या प्रभागसमिती सभापतीपदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून दिव्यातील प्रभागसमिती सभापती पदासाठी सौ.सुनिता गणेश मुंडे यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.अनेक कार्यकर्त्यांनी दिवा प्रभागसमिती येथे सौ.मुंडे यांना भेटून अभिनंदन केले आहे.


  ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभागसमिती सभापदी पदासाठी बुधवारी अर्ज दाखल करण्यात आले असून या सर्व सभापतींची निवडदेखील बिनविरोध झाली आहे.यापैकी सहा प्रभागसमित्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून एका प्रभाग समितीच्या सभापती पदावर कांग्रेस तर दोन प्रभाग समित्यांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपल्याने निवडणुकीसाठी तिनही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.


  गेल्या कार्यकाळाप्रमाणे या कार्यकाळात देखील प्रभाग समिती सभापती पदांसाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादीकडून कळवा प्रभागसमिती वर्षा मोरे,उथळसर प्रभाग समिती वहिदा खान, वागळे प्रभाग समिती एकता भोईर,दिवा प्रभाग समितीसाठी सुनिता गणेश मुंडे,वर्तकनगर प्रभागसमितीसाठी राधिका फाटक,लोकमान्य सावरकरनगर प्रभागसमितीसाठी आशा डोंगरे,नौपाडा प्रभाग समितीसाठी नम्रता फाटक,तर माजिवडा-मानपाडा प्रभागसमितीसाठी भुषण भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे.मुंब्रात कोंग्रेसच्या दिपाली भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे.


टिप्पण्या