रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार, दि. २७ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा नियोजन सभागृह, रत्नागिरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा. श्री. अनिलजी परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 


(प्रतिनिधी दिपक मांडवकर)

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार, दि. २७ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा नियोजन सभागृह, रत्नागिरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा. श्री. अनिलजी परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दापोली विधानसभामतदार संघासह इतर विधानसभा मतदारसंघातही सुरू असलेली विकास कामे अशीच सुरू राहावीत. यासोबतच कृषिक्षेत्रात विकासासाठी मुबलक पाण्याची उपलब्धता असावी या दृष्टीने विहिरींचे निर्माण करणे गरजेचे आहे. गावांतर्गत वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याच्या हेतूने रस्त्यांचे दुरुस्तीकरण, डांबरीकरण, नवीन रस्ते निर्माण व्हावे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायास चालना देणे गरजेचे आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना रोजगार मिळेल, यासंबंधी उपपयोजना करणे यासर्व मुद्यांवर दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मा. श्री. योगेशदादा कदम यांनी परखडपणे आपले मत मांडले.

तसेच महाराष्ट्र शासनातर्फे निर्णय घेण्यात आला होता की "कोयना नदीतील ६७ टीएमसी पाणी" कोकणाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्राला देण्यात यावे. त्याला सुरुवातीपासून माजी पर्यावरणमंत्री व आमदार श्री. रामदासभाई कदम व आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी विरोध केला व यासाठी शासनाला पत्रव्यवहार देखील केला. प्रथमतः कोकणाची तहान भागवली पाहिजे व यानंतरच उर्वरित महाराष्ट्राला हे पाणी दिले पाहिजे या मुद्द्यावर आधी पासून ठाम राहीले व  याबद्दल आमदार श्री. योगेशदादा कदम मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री महोदय यांनी बैठकीमध्ये ठराव मंजूर करून केला व उर्वरित महाराष्ट्राला नंतर पाणी देण्याचे आदेश दिले.

सदर बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सन्मा. श्री. उदय सामंत, जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्री. मोहीतकुमार गर्ग, रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीमती इंदुराणी जाखड,  रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. रोहन बने, जिल्ह्यातील आमदार व जिल्हा नियोजन समिती सदस्य व विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या