सोशल डिसेटन्सींग, सॅनिटायझेशन नियमभंग करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ सील करणार
ठाणे महापालिका आयुक्तांचा परिमंडळ उपायुक्त व सहाय्यक
आयुक्तांना आदेश
ठाणे (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी प्रभाग समिती स्तरावरील
कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली असून आज त्यांनी कळवा प्रभाग समितीतंर्गत विविध
ठिकाणांची पाहणी करून स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान ज्या
आस्थापना, दुकाने
सोशल डिसेटन्सींग, सॅनिटायझेशन
आणि मास्क वापराच्या नियमांचा भंग करतील त्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश
त्यांनी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिले.
प्रभाग समितीतंर्गत येणारी सर्व सार्वजनिक
शौचालयांची रोज पाच ते सहावेळा नियमितपणे साफसफाई करावी,
समितीतंर्गत येणारी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे सॅनिटाईज
करावीत असे सांगून मंगल कार्यालये, क्लब या ठिकाणी रोजच्या रोज भेटी देवून तेथील
कार्यक्रमांचा आढावा घ्यावा व त्यांच्याकडून आगावू माहिती घेणेत यावी अशा सूचना
दिल्या.
प्रभाग समितीमधील आरोग्य केंद्रांसाठी
औषधांचा आवश्यक तो साठा करणे, कोविड
१९ चाचणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा गतीमान करणे,
टीएमटीच्या बसेसचा फिरते ॲंटीजन चाचणी
केंद्र म्हणून वापर करणे, ज्या
ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे, तेथील सर्वेक्षण करणे, तापाची तपासणी करणे आदी
कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना
दिल्या.
महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सुरूवातीस
प्रभाग समिती कार्यालयामध्ये बैठक घेवून सर्व स्थानिक नगरसेवकांशी संवाद साधला.
यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा सौ. वर्षा मोरे,
नगरसेवक मिलिंद पाटील, उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका सौ. अपर्णा साळवी, सौ. अनिता गौरी, सौ. आरती गायकवाड, सौ. विजया लासे आणि सौ. पुजा
करसुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांनी
खारेगाव नाका, खारीगाव
नाका शौचालय, वास्तु
आनंद गृह संकुल, ओझोन
व्हॅली गृह संकुल आदी ठिकाणी भेट देवून तेथील नागरिकांशी संवाद साधला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा