ठाण्यात ‘मास्क का घातला नाही?’ म्हणुन विचारणा करणाऱ्या वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीला व्यापाऱ्याची धक्काबुक्की

जे.डी.वणगे नावाच्या  व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

ठाणे ( प्रतिनिधी) कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागल्याने जनतेने मास्क वापरणे बंधकारक केले आहे,मात्र प्रत्यक्षात जनता या आवाहनाला दाद देतेय का? लोक राज्य शासनाने  ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करताहेत का? याची तपासणी तथा सर्वे करणाऱ्या लोकशाहीच्या प्रतिनिधीला एका मुजोर व्यापाऱ्याकडून धक्काबुकी करण्यात आली आहे.या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात लोकांनी  तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे.ठाणे महानगरपालिकेनेही लोकांनी मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले आहे.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुख्यंमंत्र्यांनी पुन्हा टाळेबंदीसाठी 8 दिवसाचा अवधी दिला आहे.या अवधीत रुग्ण कमी न झाल्यास पुन्हा टाळेबंदी करणार असे स्पष्ट सांगितले आहे.त्यासाठी लोकांना पुन्हा मी जबाबदारीचा मंत्रही दिला आहे.त्यासाठी लोकांनी सुरक्षित अंतर, तसेच  मास्क हिच एकमेव असलेली ढाल लोकांना कोरोनापासून संरक्षण करणार असल्याने  बंधनकारक केली आहे.अन्यथा कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या याच आदेशाला ठाण्यातील बाजारपेठ येथील उर्मट व्यापारी जे.डी.वणगे याने हरताळ फासला आहे.दुकानात मास्क लावून विक्री करण्याची त्याची जबाबदारी असताना खुलेआम,मास्कचा वापर करत नसल्याचा दिसून आला.याच दरम्यान लोकशाही वृत्तवाहीनीचे पत्रकार श्री निकेश शार्दुल यांनी सर्वे दरम्यान मास्क न लावल्याचे कारण विचारले असता हा मुजोर व्यापारी अंगावर धावून आला.धक्का बुक्की करु लागला.कोणातरी भाईला फोन लावून सेटींग करु लागला. आणि हल्ल्याची तयारी करु लागला.त्यामुळे लोकांची काळजी घेण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांच्या बाबतीतला हा प्रकार निंदणीय असून जनतेसाठी कोरोनायोद्धे ठरलेले पत्रकार असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
  दरम्यान धक्का बुक्की करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात ठाणे नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून व्यापारी फरार असल्याचे समजत आहे.दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करणारी ठाणे महानगरपालिका या मुजोर व्यापाऱ्यावर कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या