स्वराज्य कोकण कलामांच (मुंबईचा) नालासोपारा येथे आयोजक डॉ. संजय जाधव आणि प्रकाश नाडकर यांनी केला पहिला हाऊसफुल कार्यक्रम

 


प्रतिनिधी ( दिपक मांडवकर)

नालासोपारा : शनिवार दिनांक २० फेब्रुवारी नालासोपारा पूर्व साई छाया विद्या मंदिर जिजाईनगर येथे आयोजक श्री. डॉ. संजय जाधव, श्री. प्रकाश नाडकर आणि श्री. दिपक मांडवकर यांच्या विद्यमाने संपन्न होत असताना कार्यक्रमाची सुरुवात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक श्री. किसन बंडागळे आणि डॉ. संजय जाधव यांचे चिरंजीव आणि सर्वांचे तरुण नेतृत्व कु. सिद्धेश संजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सुरवात झाली. स्वराज्य कोकण कलामंच (मुंबई) प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऐतिहासीक वाघानाट्य (श्रीमंतयोगी राजा सह्याद्रीचा) हा वाघानाट्य कार्यक्रम सादर झाला. कोरोना पार्श्वभूमीवर एक वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम हॉल, नाट्यगृह बंद असताना कलाकारांचे कित्तेक सांस्कृतिक मांचाचे खूप नुकसान झाले होते. परंतु पुन्हा काल नालासोपारा येथे या कार्यक्रमासाठी चारशे रशीक प्रेक्षनी उपस्थित राहून गेल्या वर्षीचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढत पुन्हा या वर्षी हा कार्यक्रम चारशे रशीक प्रेक्षकानी हजेरी लावून परिसरात धुमाकूळ घातली. स्वराज कोकण कलाकारांनी पुन्हा आपली सिद्धता खरी करून दाखवली. प्रेक्षकानी अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारे कलाकार श्री. संदेश येद्रे आणि जिजाऊंच्या भूमीकेत कु. सोनाली शिंदे, अफजल खान, औरंगजेब, सरजेराव, तानाजी मालुसरे, मावळे, सेनापती सर्वांनी आपली भुकिमा रशीकांना भाऊन गेली. 

तर या कार्यक्रमाचे निर्माते दिग्दर्शक श्री. राजेश येद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे वघनाट्य सादर करताना उत्कृष्ट कलाकार या स्वराज कोकण कलामंच (मुबई) मध्ये घडवत असल्याचे दिसून आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजक मंडळातील चाळीस सभदासनी अगदी उत्कृष्ठपणे पार पाडली. रंगमंचा मध्ये प्रवेश करतांना प्रतेक प्रेक्षकांना मास लावून बसवण्याची जबाबदारी घेऊन, प्रेकला सामाजिक अंतर पाळून बसवण्यात आले. कार्यक्रम हाऊसफुल झाल्यानंतर आयोजक श्री. प्रकाश नाडकर यांनी सर्व कलाकार आणि प्रेक्षकांन सहित सर्व चाळीस सभासदांचे आभार मानले.

टिप्पण्या