शिवराजे प्रतिष्ठाण गणेश नगर नालासोपारा येथे मोफत आरोग्य शिबिरा सह शिवजयंती साजरी

प्रतिनिधी ( दीपक मांडवकर)

नालासोपारा येथे शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त शिवराजे प्रतिष्ठाण गणेश नगर नालासोपारा पूर्व यथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश तेलंगे आणि सहकाऱ्यांच्या सहयोगाने शिवाजयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्त विविध उपक्रम राभऊन विभागातील रहिवाशांना मोफत आरोग्य शिबिराचे व मोफत मोतिबिंदू शत्रक्रिया रुग्ण नोंदणी आयोजन करताना त्यात सत्तर रहीवाश्यांनी उपबगोग घेतला. तर प्राईम मलतीलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हे योगदान मिळाली.  प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कोरोना काळात कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांना संपूर्ण सहकार्य केले त्या प्रत्येक पन्नास कोरोना योध्याना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी लेझीम पथकांच्या तालावर जोरदार प्रदर्शन करून नागरिकांची मने आनंदी करून टाकणाऱ्या कार्यक्रमा सह रात्री सुस्वर सांस्कृतीक भजन आयोजन करण्यात आले. छत्रपतींच्या जयंती निमित्त बाळ शाहीर वेदांत दीपक मांडवकर याने शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हा पोवाडा सादर करून रहिवाशांची माने जिंकली. 

शिवराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध घटकांतील गरजूना विविध मदत केली जाते. दर वर्षी अगदी उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते. तर कार्यक्रमाच्या अंतिम क्षणी शिवराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश तेलंगे यांनी त्यांच्या सहतीत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. आणि कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पण्या