एक डोश्याची गाडी उचलण्यास दहा कर्मचारी तर शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास अतिक्रमणचा कानाडोळा – श्री महेश मोरे

 


ठामपा नौपाडा अतिक्रमणची अजब कारवाई

ठाणे (सचिन ठिक) नियमभंग करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ सील करा असा ठाणे महापालिका आयुक्तांनी परिमंडळ उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना आदेश दिला मात्र या आदेशालाच हरताळ फासण्याचा कार्यक्रम अतिक्रमण विभागाकडून होत असल्याचे चित्र आहे.एकीकडे डोश्याची गाडी उचलण्यास दहा-दहा कर्मचारी हजर राहतात मात्र गर्दीचा महापूर भरणाऱ्या ठाणे स्टेशन परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यास एकही कर्मचारी येत नसल्याने या पालिका कर्मचाऱ्यांचा अजब कारभार चालू असल्याचे भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे कोकण सरचिटणीस श्री महेश मोरे यांनी एका वृत्तवाहीनीद्वारे निदर्शनास आणून दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी प्रभाग समिती स्तरावरील कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली असून त्यांनी प्रभाग समितीतंर्गत विविध ठिकाणांची पाहणी करून कारवाई करण्यास सुरवात केली आहे.दरम्यान ज्या आस्थापना, दुकाने सोशल डिसेटन्सींग, सॅनिटायझेशन आणि मास्क,गर्दी करणारे नागरिक नियमांचा भंग करतील त्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश त्यांनी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिले असताना मात्र ठाणे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास अभय दिले जात असल्याचे समोर येत आहे.

या परिसरात प्रवासांची प्रचंड़ वर्दळ असताना अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसर जाम करण्यास सुरवात केली आहे.जागोजागी अनधिकृत फळविक्रेते,कपडा विक्रेते,छोट्यामोठ्या फेरीवाल्यांनी परिसर काबीज केला आहे.त्यामुळे या फेरिवाल्यांमुळे कोरोना पसरण्याची सर्वाधिक भीती असून पालिका अतिक्रमणचे कर्मचारी मात्र जाणूनबूजून कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.एकीकडे ठाण्यातील लेडीज बार,रेस्टारन्टवर सोशल डिस्टन्सींग न पाळल्याबद्दल कारवाई होत असताना खचाखच फेरीवाल्यांनी व्यापलेला ठाणे स्टेशन परिसरात मात्र का कारवाई होत नाही? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

एक डोश्याच्या गाडी उचलण्यास दहा कर्मचारी

नौपाडा परिसरात एका मराठी व्यवसायिकाने स्वयंरोजगारासाठी पालिकेकडून १० हजार रुपये कर्ज घेवून डोश्याची गाडी लावली होती.यातून त्याचा उदरनिर्वाह चालत होता.टाळेबंदीमुळे या डोसा व्यवसायिकावर उपासमारिची पाळी आली होती.मात्र जसे पालिका कर्मचार्यांच्या ही गाडी रस्त्यालगत असल्याचे दिसून आले असता दहा-दहा कर्मचारी उचलून नेण्यासाठी हजर झाले.एकीकडे ठाणे स्टेशन परिसरात शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांनी चक्काजाम सुरु केला असताना एकट्या मराठी व्यवसायिकावरच कारवाई का ?स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर का अतिक्रमण कारवाई करीत नाही? याबाबत आम्ही कोर्टात जाणार असून सबंधित मराठी व्यवसायिकावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही दाद मागणार आहोत. तसेच ठाण्यातील रस्त्यावर काबीज करणारे जेवढे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

श्री महेश मोरे,भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी,कोकण सरचिटणीस,

टिप्पण्या