लांजात निराधार अबलेचा पडक्या घरात मोडका संसार, खानवली लावगण येथील धक्कादायक प्रकार


लांजा I दिपक मांडवकर

लांजा तालुक्यातील खानवली लावगण येथील एका निराधार विधवा महिलेवर केले शासनाने आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे पडक्या घरात मोडका संसार करण्याची वेळ येवून टेपली आहे. ना लाईट ना पाणी,या घराची स्थिती जनावरांच्या गोठ्या पेक्षा बिकट झाली असून ही निराधार महिला शासनाकडे कुणी घर देता का घर अशी विनवणी करीत आहे.

 लांजा तालुक्यातील खानवली लावगण मांडवकरवाडी गावातील श्रीमती यशोदा यशवंत   मांडवकर ही वृद्ध महिला अतिशय गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याने प्रशासनाकडे मदतीची विनवणी करीत आहे. गेल्या १५ वर्षा पूर्वी पती कै. यशवंत मांडवकर यांचा अल्पशा आजाराने मुतृ झाल्या नंतर त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आपल्या पती आणि वडिलांच्या निधनानंतर त्या पुर्णपणे निराधार झाल्या आहेत.त्यामुळे महिलेची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.

  मातीच्या भिंती असलेले जुनाट घर आता दररोज ढासळू लागले आहे. घराचे असलेले लाकूड आणि भिंती देखील आता शेवटचा श्वास घेत आहे. गेल्या पाच वर्षा पासून जनावरांच्या गोठ्या पेक्षा बिकट परिस्थिती असलेल्या त्या घरात दोघी माय लेकी मुठीत जीव घेवून राहत आहेत. उरलेले मोडके घर कधीही अंगावर पडेल अश्या परिस्थितीत आहेत. अशी अवस्था असताना या निराधारांना एखादे पक्के घर देता येईल का? याची कोणतीही दखल खानावली ग्रामपंचायतीने घेतलेली दिसून येत नाही.

 महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळणारी अबला आवास योजना महिला बचतगट च्या माध्यमातून २ वर्ष झाली मिळू लागली मात्र मागास व विधवा महिलांसाठी विविध योजना यांच्या पर्यंत का पोहोचल्या नाही? घरकुल आणि निराधार आवास योजना कोण पोहोचवणार? ग्रामपंचायत वाडीतील सदस्य आजपर्यंत यांच्या व्यथा ग्रामसभेत मांडून देखील याचा शासन दरबारी का विचारू शकले नाहीत? घरकुल योजने मध्ये दोन वर्षे नाव समाविष्ट असूनही का घरकुल मंजूर झाले नाही अशा प्रश्न पडला आहे. मग या योजना सदर महिलेच्या मृत्युनंतर शासन देणार का असा सवाल जनता करीत आहे.

 सदर परिस्थिती अत्यंत बिकट असताना ही ६० वर्षाची महिला मोल मजुरी करून आपल्या मुलीसह उदरनिर्वाह करत आहे. महत्वाची बाब म्हणजे या महिलेच्या मुलीचे लग्न  वाघरट या गावात झाले होते. परंतु तिच्या पतीची देखील परिस्थिती आणि वेसनाच्या आहारी असल्याने तिच्या मुलीला कधी संसार तर कधी आई पोटी माहेर असे पाहावे लागत आहे. तिला देखील दोन लहान मूल आहेत. ती देखील या गरिबीची शिकार बनली आहेत. आजीची परिस्थिती बिकट असताना ती मूळ लावगण येथे शाळेत शिक्षण घेत आहेत. आणि ती सुद्धा आई प्रमाणे निराधार झाली. या दोघी माय लेकींच्या बिकट प्रवासात आज पर्यंत कोणीही का सहभागी झाले नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

 या महिलेच्या जीवघेण्या घरातील बिकट प्रवासाला जबाबदार कोण? ग्रामपंचायत, तहसीलदार, की महाराष्ट्र शासन असा जाब विचारण्याची वेळ आता येऊन टेपली आहे. या महिलेच्या परिस्थितीची दखल न घेतलेल्या सर्व जबाबदार व्यक्तिंना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. अश्या बिकट परिस्थितीचा सामना करण्याऱ्या महिलेला लवकरात लवकर शासकीय अधिकृ सुविधा मिळाव्यात म्हणून आता तिची धाव ग्रामपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी, आणि आमदार व मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचणार आहे.

टिप्पण्या