घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विरार गुन्हेशाखा कक्ष-3 कडून अटक


नालासोपारा :- प्रतिनिधी दीपक मांडवकर

दिनांक ७/३/२०२१ रोजी सकाळी ९ वाजता ते दिनांक १४/३ ३०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता दरम्यान खबर देणारे श्री.रमेश धोंडू हुंबरकर वय ४० वर्ष ए/२०२, न्यू संगम , गगनविहार कॉम्लेक्स आचोले रोड ,लेक साईट हॉटेल समोर नालासोपारा पूर्व ता. वसई, जि. पालघर हे त्यांच्या भाचीच्या लग्नाला त्यांच्या मूळगावी मु. पो.तळा, माणगाव जि. रायगड येथे गेले असताना त्यांच्या बंद रुमचे किचनच्या खिडकीचे बाहेरील लोखंडी ग्रील कोणीतरी आज्ञात चोरट्याने तोडून वाकवून खिडकीची काच उघडून त्यावाटे  किचनमध्ये प्रवेश करून प्लॅटचे दोन्ही बेडरुम मधील पलंगामधील २५ तोळे सोने, १ किलो चांदी व १७,००,००० /- रुपये रोख रक्कम अशी एकूण २४,९३,०००/- रुपये किंमतीचे सोने, चांदी दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेली बाबत तुलिंज पो.ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरून गु.र.न.३८०/२०२१ भा. द.वि. स. क.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दि.१५/३/२०२१ रोजी दुपारी ३.११ मिनिटांनी गुन्हा नोंद करण्यात आली.मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे. मा. सह पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाने गुन्हे शाखा कक्ष -३ विरार चे पोलीस पथक यांनी नमूद गुन्हाचे तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण सि।सी.टी. व्ही.फुटेज ,गुप्त बातमीदार ,गुन्हे करण्याची पध्दत याबाबत सखोल तपास करून तसेच पो.मनोज सकपाळ यांनी बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीस नामे. अब्दुल शेख वय.४३ वर्षे रा.गाला नंबर-२,ओम नमो शिवाय बिल्डिंग जे.बी. एस हायस्कूल ,अल्कापुरी नालासोपारा पूर्व यांस ताब्यात घेऊन त्यांचे कब्जातुन एकूण २९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ,२ किलो चांदीचे दागिने व नाणी तसेच रोख रक्कम ९,७६,२५०/- रुपये व गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा मोठर सायकल असा एकूण १८,५३,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

      वरील कामगिरी मा. श्री. सदानंद दाते पोलीस आयुक्त, श्री.एस जयकुमार पोलीस आयुक्त सो, श्री.डॉ.महेश पाटील पोलीस उप  आयुक्त सो (गुन्हे),श्री.रामचंद्र देशमुख सह पोलीस आयुक्त सो(गुन्हे), भी .भा.वी व.पोलीस आयुक्तलय यांचे मार्गदर्शनाखाली पो नी/प्रमोद बडाख,पोनीउप/उमेश भगत,सफो/अनिल वेळे, पो.हवा/अशोक पाटील, पो.ना/मनोज चव्हाण, पो. ना/प्रदिप टक्के, पो.ना/मुकेश तटकरे, पो.ना/सागर बावरकर,पो.ना/मनोज सकपाळ,पो.शी/अश्विन पाटील, सर्व नेम गुन्हे शाखा कक्ष -३ विरार यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे

टिप्पण्या