कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणी शिबीराला उत्तम प्रतिसाद.

 


लांजा : प्रतिनिधी 

कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना, लांजा प्रकल्पातील सॅम व मॅम श्रेणीत येणाऱ्या कुपोषित बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर बुधवार दि. १७/०३/२०२१ रोजी श्री. साई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल लांजा येथे घेण्यात आले. 

यावेळी तालुक्यातील २७ मुलांची आरोग्य तपासणी बालरोग तज्ञ डॉ. श्री. प्रविण सुतार व बालरोगतज्ञ डॉ. श्री. मनोज किंजळे यांचे मार्फत करण्यात आली. यावेळी सर्व मुलांना मोफत विटॅमिन पावडर व औषधे उपलब्ध करून देण्यात आली. 

या कार्यक्रम प्रसंगी बालरोग तज्ञ डॉ. श्री. प्रविण सुतार, बालरोगतज्ञ डॉ. श्री. मनोज किंजळे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी श्रीम. स्वाती गाडे मॅडम यांनी उपस्थित पालक वर्ग यांना मुलांचे आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, आहार व औषधोपचार यासंबंधी मार्गदर्शन केले. 

आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, संचालक श्री. शांताराम गाडे, श्री. नंदकुमार आंबेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप डाफळे, अंगणवाडी सुपरवायझर श्रीम. गोरे मॅडम, तालुक्यातील अंगणवाडी सेविका, श्री. साई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांचा नर्सिंग स्टाफ, तसेच संस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यांनी बहुमोल सहकार्य केले. 

टिप्पण्या